पृथ्वीचं एकूण वजन किती आहे? उत्तर वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 02:27 PM2024-04-01T14:27:13+5:302024-04-01T14:27:40+5:30

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, पृथ्वीचं एकूण वजन किती आहे? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

What is the weight of the entire earth know the answer | पृथ्वीचं एकूण वजन किती आहे? उत्तर वाचून व्हाल अवाक्...

पृथ्वीचं एकूण वजन किती आहे? उत्तर वाचून व्हाल अवाक्...

पृथ्वीवर विशाल डोंगर, जंगल, नद्या, समुद्र आणि अब्जो जीव-जंतु आहेत. यांच्या संतुलनामुळे जीवन शक्य आहे. पण या सगळ्यांचं वजन करणं अशक्य आहे. पृथ्वीवर किती पाणी आणि किती जमीन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण अशात तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, पृथ्वीचं एकूण वजन किती आहे? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

पृथ्वीचं वजन किती?

पृथ्वीचं वजन किती असेल असा प्रश्न कधीना कधी तुमच्या मनात आला असेल. पण वैज्ञानिकांनुसार, पृथ्वीचं वजन त्यावर असलेल्या गुरूत्वाकर्षणावर अवलंबून आहे, जे अब्जो किलो असू शकतं. लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार, पृथ्वीचं वजन 5.9722×1024 किलोग्रॅम किंवा जवळपास 13.1 सेप्टिलियन पाउंड आहे. हे वजन इजिप्तच्या पिरॅमिडपेक्षा जवळपास 13 क्वाड्रिलियन बरोबरीचं आहे. जे जवळपास 4.8 बिलियन किलोग्रॅम आहे.

अंतराळातील धूळ आणि आपल्या वायुमंडळातून निघाणाऱ्या गॅसमुळे पृथ्वीच्या द्रव्यमानात थोडा चढ-उतार होत असतो. पण हे छोटे बदल पृथ्वीला अब्जो वर्षापर्यंत प्रभावित करत नाहीत. तरीही लोक असं मानतात की, पृथ्वीचं वजन 6,000,000,000,000,000,000,000,000 किवो मानून चालतात.

जगभरातील भौतिक वैज्ञानिकांचं मत आहे की, पृथ्वीचं वजन कोणत्याही पद्धतीने मोजणं शक्य नाही. ज्याचं कारण पृथ्वीवर असलेलं गुरूत्वाकर्षण आहे. याच्या आधारावर तापमान ठरतं. सय आयजॅक न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार, प्रत्येक वस्तु ज्यात द्रव्य असतं, त्यात गुरुत्वाकर्षण बलही असतं. याचा अर्थ कोणत्याही वस्तूमध्ये नेहमी बल असणं असा होतो. वजन एक बल आहे, जे मोजण्यासाठी नेहमी गुरुत्वाकर्षण शक्तीची गरज पडते. अशात तुम्ही कोणत्या भागाचं वजन करत आहात त्याआधी तेथील गुरुत्वाकर्षण कसं आहे हे जाणून घ्यावं लागेल.

Web Title: What is the weight of the entire earth know the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.