मुकेश अंबानींच्या घरातील कचऱ्याचं काय केलं जातं? वाचून म्हणाल जियो अंबानी जियो...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 01:55 PM2021-10-02T13:55:53+5:302021-10-02T13:56:36+5:30
मुकेश अंबानीचं हे घर देशातील सर्वात महागड्या आणि मोठ्या घरांमध्ये सामिल आहे. २७ मजली या घरात ६०० नोकर काम करतात जे घराची देखरेख करतात.
सोशल मीडियावर रोजच लोकांना हैराण करणाऱ्या बातम्या व्हायरल होत असतात. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची तर रोजच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होतच असते. त्यांचं घर एंटीलियाची तर वेगवेगळी चर्चा सुरू असते. याच घराबाबत एक खास बाब आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यात आम्ही तुम्हाला एंटीलियातील कचऱ्याबाबत सांगणार आहोत.
काय केलं जात कचऱ्याचं?
मुकेश अंबानीचं हे घर देशातील सर्वात महागड्या आणि मोठ्या घरांमध्ये सामिल आहे. २७ मजली या घरात ६०० नोकर काम करतात जे घराची देखरेख करतात. घरातील छोट्यातील छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असण्याची जबाबदारी नोकरांकडे असते. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घरातील कचऱ्याची चर्चा होत आहे. यात सांगण्यात आलं आहे की, मुकेश अंबानी यांच्या घरातील कचऱ्याचं नेमकं काय केलं जातं? याचं उत्तर जाणून घेऊन तुम्हीही हैराण व्हाल. अंबानी यांच्या घरातील कचऱ्यापासून वीज तयार केली जाते.
कशी तयार केली जाते वीज?
मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा कधीच फेकला जात नाही. उलट त्याचा वापर वीज तयार करण्यासाठी केला जातो. असं सांगण्यात आलं आहे की, त्यांच्या घरात एका खास सिस्टमने कचऱ्यापासून वीज तयार केली जाते. सर्वातआधी सूका आणि ओला कचरा वेगळा केला जातो. त्यानंतर त्यापासून वीज तयार केली जाते. इतक्या मोठ्या घरात विजेचा वापरही मोठा होतोच. ज्यामुळे ही वीज कामात येते.
अंबानींच्या घराच्या खास बाबी
या घरात १६८ कार पार्क करण्याची सोय आहे.
घराच्या छतावर तीन हेलिपॅड आहेत.
घरात स्वीमिंग पूल आणि स्पा रूमही आहेत.
घरात एसी नाही. घराचं तापमान स्वत: ठरवू शकतात.
मुकेश अंबानी यांच्याकडे त्यांची स्वत:ची एअरबस आहे