आपण अनेकदा बघतो की, लहान मुला-मुलींसोबत मोठ्या लोकांनाही टेडी बियरची क्रेझ असते. पण तुम्ही विचार केलाय का की, लहानांसोबतच मोठ्यांनाही टेडी बियर इतका का आवडतो? यामागे काय कारण असू शकतं? तर फ्रान्सच्या एइक्स मार्सिले यूनिवर्सिटीतील अभ्यासकांनी यामागचं कारण शोधून काढलं आहे.
अभ्यासकांचं मत आहे की, टेडी बियर केवळ त्यांच्या क्यूट दिसण्यामुळे, स्माईलमुळे किंवा ते गुबगुबीत असतात म्हणून खास नसतात. ते खास असतात कारण आपलं त्यांच्यासोबत भावनात्मक कनेक्शन असतं. या रिसर्चसाठी 300 पेक्षा जास्त वयस्क लोकांचा सर्वे करण्यात आला. ज्यात त्यांना बालपणीच्या टेडी बियर आणि इतर खास वस्तुंच्या अनुभवाबाबत विचारण्यात आलं.
या रिसर्चमधून अभ्यासकांना असं आढळलं की, टेडी बियर आवडण्यामागे भावनात्मक जिव्हाळा आहे. ते एका खेळण्यापेक्षा जास्त होतं. तो तुम्हाला तुमच्या इतिहासाशी जोडतं. ते मनुष्यांच्या भावनात्मक विकासात एक मोठी भूमिका निभावतात. कारण बालपणी आपलं त्यांच्यासोबत एक खास कनेक्शन असायचं, आपण त्यांच्याकडे मोकळे होऊ शकत होतो.
या रिसर्चमध्ये असं आढळलं की, अनेक वयस्क लोकांकडे आताही त्यांचे बालपणीचे टेडी आहेत. ते केवळ जुनी आठवण किंवा नॉटेल्जिया म्हणून नाही तर आताही ते भावनात्मक सुरक्षा देतात आणि हे केवळ मुलांसोबतच नाही तर मोठ्यांसोबतही होतं.
टेडीच्या नाजूक स्पर्शाने ऑक्सोटिन हार्मोन निघतात. झोपताना जवळ ठेवले तर झोपही चांगली लागते. टेडी हे केवळ एक शोभेची किंवा खेळण्याची वस्तू नाही तर एक सामाजिक बंधन तयार करण्याची भूमिका बजावतात. जर्नल ऑफ पॉजिटिव साइकोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, कशाप्रकारे आपल्या जीवनात वस्तू फार महत्वाच्या असतात आणि त्यांच्यासोबत खोलवर भावनिक नातं असू शकतं.