फॅशन फोटोग्राफीतील मॉडल्स हसत का नाहीत? तुम्ही याचा विचारही केला नसेल....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 12:47 PM2020-01-03T12:47:18+5:302020-01-03T12:52:31+5:30
तुम्ही अनेकदा फॅशन विश्वातील मॉडल्सना बघत असला, त्यांचे फोटो बघत असाल. त्यात कधीच कोणतेही मॉडल्स हसताना दिसत नाही. त्यांची स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेते.
(Image Credit : quora.com)
तुम्ही अनेकदा फॅशन विश्वातील मॉडल्सना बघत असला, त्यांचे फोटो बघत असाल. त्यात कधीच कोणतेही मॉडल्स हसताना दिसत नाही. त्यांची स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेते. तुम्हालाही कधीना कधी असा प्रश्न पडला असेल की, हे मॉडल्स हसत का नाही? चला तर जाणून घेऊ अनेकांच्या मनात असलेल्या या प्रश्नाचं उत्तर....
(Image Credit : slideshare.net)
एकीकडे फॅशन विश्वातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू दिसत नाही तर दुसरीकडे कमर्शिअल मॉडल्सना फार आनंदी दिसणं गरजेचं असतं. कारण त्यांचा उद्देश काहीतरी वस्तू विकण्याचा असतो. मात्र, फॅशन विश्वातील मॉडल्स हसत नाहीत. याचं म्हणजे ते फॅशन फोटोग्राफीच्या माध्यमातून ते तुम्हाला काही विकत नसतात तर तुम्हाला त्यांचं स्टेटस विकत असतात.
तसेच हसरा चेहरा समोरच्या व्यक्तीला खूश करण्यासाठी असतो. आपला चेहरा भावनाहिन करून फॅशन विश्वातील मॉडल्सना ही जाणीव करून द्यायची असते की, त्यांना आपल्याला खूश करण्याबाबत काही देणं-घेणं नाही किंवा त्यांना असं काही करण्याची गरज नाही. आपणं स्वाभाविकपणे या लोकांचे भावनाशून्य चेहरे बघून त्यांना हाय स्टेटससोबत जोडण्याचा अट्टहास करत असतो.
मुळात जेव्हा मॉडल्स एक्सप्रेशन देत असतात तेव्हा असं नाही वाटलं पाहिजे की, ते आपल्याला काहीतरी विनंती करीत आहेत. त्यांना विनंती करायचीच नसते. त्यांचा उद्देश त्यांनी घातलेले कपडे दाखवणे हाच असतो. मग तुम्हाला फोटो पसंत येवो अथवा नको. पण तुम्ही हे अजिबात नकारू शकत नाही की, हसरे चेहरे नसले तरी मॉडल्स कमालीचे आकर्षक आणि सुंदर दिसतात.