काय सांगता! अंतराळातील एक असं ब्लॅक होल जे हृदयासारखं 'धडधडतं', पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 11:52 AM2020-06-15T11:52:42+5:302020-06-15T12:09:29+5:30

2007 मध्ये पहिल्यांदा या ब्लॅक होलची माहिती मिळाली होती. त्यावेळी या ब्लॅक होलच्या आत असलेल्या एका वेगळ्या गोष्टीने सर्वांचं लक्ष केंद्रीत करून घेतलं होतं. 

Why is this black hole's heart 'beating' so regularly? | काय सांगता! अंतराळातील एक असं ब्लॅक होल जे हृदयासारखं 'धडधडतं', पण का?

काय सांगता! अंतराळातील एक असं ब्लॅक होल जे हृदयासारखं 'धडधडतं', पण का?

Next

अंतराळात अनेक रहस्य आहेत ज्यांबाबत वैज्ञानिकांनाही पूर्णपणे माहिती नाही. असंच एक रहस्य ब्लॅकहोलसंबंधी आहे. अतंराळात असलेल्या या विशाल ब्लॅक होलचं 'हृदय' सतत 'धडधडत' आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा या ब्लॅक होलची माहिती मिळाली होती. त्यावेळी या ब्लॅक होलच्या आत असलेल्या एका वेगळ्या गोष्टीने सर्वांचं लक्ष केंद्रीत करून घेतलं होतं. 

हृदयाप्रमाणे धडधडतय ब्लॅक होल

ज्याप्रकारे आपलं हृदय धडधडत असतं, तसेच या ब्लॅक होलमधून नियमित अंतराने उर्जेचे तरंग निघत आहेत. 2011 पर्यंत लागोपाठ हे ऊर्जेचे तरंग वैज्ञानिकांना जाणवले. त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडत गेली. ज्या सॅटेलाइटने हार्डवेअरपासून या ब्लॅक होलवर नजर ठेवली जात होती, तो सूर्याच्या हस्तक्षेपामुळे ब्लॅक होलची माहिती मिळवू शकला नाही. ब्लॅक होलमधून येत असलेले सिग्नल बंद झाले आणि अंतराळ अभ्यासकांना सात वर्षांपर्यंत वाट बघावी लागली. त्यानंतर ब्लॅक होलवर नजर ठेवण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी तयार करण्यात आली.

आजूबाजूचं सगळं काही खातं ब्लॅक होल

सर्वात रोमांचक बाब म्हणजे ब्लॅक होल अजूनही तिथे आहे आणि नियमित अंतराने धडधडत आहे. ब्लॅक होलबाबत असे सांगितले जाते की, जे काही याच्या आजूबाजूला असतं ते तो खातो. इतकेच काय तर प्रकाशाची किरणेही ब्लॅक होल त्याच्या आत खेचतो. 

वैज्ञानिक सांगतात की, यानंतरही ब्लॅक होल अंतराळात ऊर्जा सोडतो. असे मानले जाते की, ब्लॅक होलच्या चारही बाजूने वस्तूंचा वेढा असतो ज्याला अक्रीशन डिस्क म्हणतात. हे धूळ, गॅस आणि एखाद्या ग्रहाचे भव्य तुकडे असतात. ही एका ब्लॅक होलची सामान्य ओळख असते.

'ब्लॅकहोलचं धडधडणं दुर्मीळ घटना'

रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटीमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, आपल्या आकाशगंगेत एखाद्या ब्लॅक होलचा हा व्यवहार फार दुर्मीळ आहे. गेल्या काही वर्षात वैज्ञानिक या ब्लॅक होलचे ठोके ऐकत आहेत. पण त्यांनाही अजून हे कळू शकलेलं नाही हे  संपूर्ण तंत्र कसं काम करतं. आम्हाला आतापर्यंत इतकंच माहीत आहे की, ब्लॅक होल अंतराळातील त्याच्याजवळ असलेली प्रत्येक वस्तू खातो आणि त्याने मोठ्या प्रमाणात ऊर्जा निघते.

ब्लॅक होलमधून सिग्नल

वैज्ञानिकांना अजून हे कळू शकलं नाही की, अनेक वर्षांपासून कशाप्रकारे ब्लॅक होलचं 'हृदय' असामान्य रूपाने धडधडत आहे. या रिसर्चशी संबंधित डॉक्टर चिचुआन जिन म्हणाले की, 'ही धडधड फार शानदार आहे. याने हे सिद्ध होतं की, अशाप्रकारचे सिग्नल एका भव्य ब्लॅक होलमधून येत आहेत, जे फार जोरदार आहेत आणि सतत येत आहेत. याने निसर्गाबाबत जाणून घेण्याची आणि या धडधडण्याचा स्त्रोत जाणून घेण्याची संधी आहे'.

डायनॉसोरच्या युगात होता हा विशाल प्राणी, वैज्ञानिक अजूनही शोधू शकले नाही त्यांच्याबाबतचं पूर्ण रहस्य

आता हेलिकॉप्टरमध्येही फिरता येईल डबल सीट, 'या' पठ्ठ्यानंं ड्रोनपासून तयार केलं दोन सीटर हेलिकॉप्टर....

Web Title: Why is this black hole's heart 'beating' so regularly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.