Why do we yawn when see other : आपण अनेकदा बघतो की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासमोर जांभई देते तेव्हा आपल्यालाही जांभई येते. तुम्हालाही अनेकदा हा अनुभव आला असेल. पण असं का होतं याचा विचार तुम्ही कधी केला नसेल. अशात आज आम्ही तुम्हाला यामागचं वैज्ञानिक कारण सांगणार आहोत.
जेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा अनेकांना वाटत असतं की, दुसऱ्यांना बघून आपल्यालाही जांभई येणं एखादं बॅक्टेरिअल किंवा व्हायरल इन्फेक्शन तर नाही ना. पण एकमेकांना बघून असं का होतं? यावर वैज्ञानिकांनी अभ्यासही केला आहे. नंतर याचं जे कारण समोर आलं ते मेंदुशी संबंधित आहे.
इटालियन वैज्ञानिकानुसार, याच्यामागे एका खास न्यूरॉनचा हात आहे. याला मिरर न्यूरॉन असं म्हणतात. जसं की, नावावरून समजतं की, हे न्यूरॉनच्या व्यक्तीचा प्रतिछाया तयार करतो.
हे न्यूरॉनचा संबंध काहीही नवीन शिकणे, नक्कल करणे आणि सहानुभूती दाखवण्यासंबंधी आहे. याचा शोध जियाकोमो रिजोलाटी नावाच्या न्यूरो बायोलॉजिस्टने लावला होता. मनुष्यावर जेव्हा याबाबत अभ्यास झाला तेव्हा समजलं की, हे न्यूरॉन तंतोतंत तेच काम करतात जे समोरची व्यक्ती करत असेल. दुसऱ्या व्यक्तीचे न्यूरॉन अॅक्टिव होऊन त्यांनाही तसंच करण्यास सांगतात.
मिरर न्यूरॉन मेंदुचे चार भाग, प्री मोटर, इंफीरियर फ्रंटल गायरस, पेराइटल लोब आणि सुपीरियल टेम्पोरल सुलकसमध्ये आढळतात. मेंदुच्या चारही भागांच्या काम करण्याच्या क्षमतेवर हे न्यूरॉन आपला प्रभाव पाडतात. पण ऑटिज्म, सीज़ोफ्रीनिया आणि मेंदुसंबंधी आजारामध्ये हे न्यूरॉन प्रभावित होतात आणि ते आधीसारखं प्रभावी काम करत नाहीत.