लठ्ठ होता म्हणूण सोडून गेली बायको, बॉडी बिल्डर झाला अन्....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 02:06 PM2019-05-22T14:06:20+5:302019-05-22T14:14:08+5:30
जपानमधील एका व्यक्तीने केलं आहे. त्याचं मन दुखावलं आणि त्याने आता असं काही करून दाखवलं की, सगळेच त्याचं कौतुक करत आहेत.
असं म्हणतात की, ब्रेकअप झाल्यावर किंवा प्रिय व्यक्ती सोडून गेल्यावर एकतर ती व्यक्ती पार उद्धस्त होते नाही तर काही लोक या दु:खाचा सकारात्मक वापर करून खूपकाही मिळवतात. असंच जपानमधील एका व्यक्तीने केलं आहे. त्याचं मन दुखावलं आणि त्याने आता असं काही करून दाखवलं की, सगळेच त्याचं कौतुक करत आहेत. या जपानी व्यक्तीला तो जाड असल्याने त्याची पत्नी सोडून गेली होती. त्यानंतर या व्यक्तीचं जीवनच पार बदलून टाकलं.
जपानमधील Shirapyon चा पाच वर्षांपूर्वी पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. याचं कारण होतं त्याचा लठ्ठपणा. पत्नीने या कारणाने सोडल्यामुळे Shirapyon ला फार दु:खं झालं आणि तो नशेच्या आहारी गेला. दु:खं विसरण्यासाठी तो पेगवर पेग भरू लागला. पण एक दिवस त्याने निर्णय घेतला की, तो आता बॉडी बिल्डिंग करणार. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही.
एका मुलाखतीत Shirapyon ने सांगितले की, 'मी १२ किलो वजन कमी केलं. ज्यासाठी मी तासनतास जिम गाळला आणि हेल्दी डाएट फॉलो केली. मी पहिल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत यशस्वी ठरू शकलो नाही. पण मी हार मानली नाही. मी अनेक आव्हानांचा स्विकार केला आणि स्वत:ला आणखी मजबूत केलं. आता हे करत असताना मला चार वर्ष झालीत'.
Shirapyon सांगतो की, 'ज्या कारणामुळे माझ्या जीवनात हा बदल झाला आहे. त्याने मी आनंदी आहे. जर जीवनात काही करायचं असेल तर याच जीवनात करा'.
Shirapyon च्या मेहनतीमुळे त्याचं जीवन आता फार सुंदर झालं आहे. आता त्याला नवीन लाइफ पार्टनर मिळाली आहे. ती एक बिकीनी फिटनेस मॉडल आहे. दोघेही आनंदी आहेत. तो यावर म्हणतो की, 'मी माझं शरीर बदललं आणि माझं नशीबच बदलून गेलं'.
Shirapyon चं मत आहे की, असं नाही की, तुमचं जीवन बॉडी बिल्डिंगमुळे बदलेल. कारण काहीतरी मिळवण्यासाठी बॉडी बिल्डिंग नाही तर इच्छाशक्ती गरजेची आहे. आवड महत्त्वाची आहे. त्यानेच तुम्ही पुढे जाल.