बोंबला! पतीवर संशय आल्याने चाकूने भोसकलं, सत्य समजल्यावर सरकली तिच्या पायाखालची जमीन...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 04:19 PM2021-01-27T16:19:58+5:302021-01-27T16:21:27+5:30
आरोपी पत्नीने पतीवर चाकूने केला कारण तिने पतीचे एका कमी वयाच्या महिलेसोबतचे प्रायव्हेट फोटो पाहिले होते.
मेक्सिकोमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने गैरसमजातून आपल्या पतीवर चाकूने हल्ला केला. आरोपी महिलेने तिच्या पतीच्या मोबाइलमध्ये एका महिलेसोबतचे प्रायव्हेट फोटो पाहिले होते. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा ती हैराण झाली आणि आता ती तुरूंगात आहे.
मेक्सिकोतील स्थानिक वृत्तपत्र ला प्रेन्साच्या वृत्तानुसार, आरोपी पत्नीने पतीवर चाकूने केला कारण तिने पतीचे एका कमी वयाच्या महिलेसोबतचे प्रायव्हेट फोटो पाहिले होते. नंतर तिला हे समजलं की, फोनमध्ये पतीसोबत जी महिला आहे ती दुसरी कोणती महिला नसून ती स्वत: आहे. हा धक्कादायक घटनाक्रम सोनोरा सीटीमध्ये समोर आला.
मीडिया रिपोर्टनुसार लियोनोरा नावाच्या महिलेने तिचा पती जुआनवर चाकूने हल्ला केला. तिने पतीला स्पष्टीकरण देण्याची संधीच दिली नाही. शेजाऱ्यांनी यांच्या घरातील आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. पीडितेच्या पतीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तो कसातरी यातून वाचला आहे.
पतीने केला रहस्याचा उलगडा, पत्नीला धक्का
जुआनने सांगितले की, त्याने पत्नीचा राग थंड करण्यासाठी तिला हे विचारले की, ती चाकूने का मारत आहे. तेव्हा पत्नीने पतीला फोनमधील काही फोटो दाखवे. तेव्हा पतीने रहस्यावरून पडदा उठवत सांगितले की, फोटोत त्याच्यासोबत दिसणारी महिला स्वत: त्याची पत्नी लियोनोरा आहे. यानंतर जेव्हा लियोनोराने आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला आठवलं आणि धक्का बसला. तेव्हा ती पतीला माफी मागत होती.
लग्नाच्या आधीचे फोटो
हे फोटो तेव्हाचे होते जेव्हा दोघांचं लग्नही झालं नव्हतं. त्यावेळी दोघे एकमेकांना डेट करत होते. जुन्या फोटोत लियोनोरा फार स्लीम आणि तरूण होती. काळानुसार तिच्या दिसण्यात बराच बदल झाला. ती स्वत:ला ओळखू शकली नाही. तेव्हा काढलेली काही फोटो जुआनच्या ई-मेलमध्ये सेव्ह होते. ते त्याने नंतर आठवण म्हणून फोनमध्ये सेव्ह केले होते. म्हणजे जुन्या फोटोमुळे बिचाऱ्या पतीचा जीव थोडक्यात जाता जाता राहिला.
पत्नी तुरूंगात
पोलिसांनी केस दाखल करून आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. आता हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. आरोपी पत्नी तिच्या सुनावणीची वाट बघत आहे. लियोनोरावर कौंटुबिक हिंसाचाराची केस दाखल झाली आहे. यात ती दोषी आढळली तर तिला मेक्सिकोच्या कायद्यांनुसार, बऱ्याच वर्षांची शिक्षा होऊ शकते.