बाबो! तरूणीने एका बुक्कीत फोडली हवेतील विमानाच्या खिडकीची काच, इतर प्रवाशी 'कोमात'...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 01:45 PM2020-06-16T13:45:56+5:302020-06-16T13:55:37+5:30
एका महिलेने रागाच्या भरात हवेतील विमानाच्या खिडकीला बुक्की मारून काच फोडली आणि विमानात एकच गोंधळ उडाला.
काही महिन्यांपूर्वी एक बातमी समोर आली होती की, एका व्यक्तीने चुकून बाथरूमचा दरवाजा समजून विमानाचा इमरजन्सी दरवाजा उघडला होता. सुदैवाने विमान हवेत नव्हतं. पण आता तुम्हीच विचार करा विमानात काय स्थिती झाली असती. पण आता तर एका महिलेने रागाच्या भरात 30 हजार फूट उंचीवर हवेतील विमानाच्या खिडकीला बुक्की मारून काच फोडली आणि विमानात एकच गोंधळ उडाला.
7 न्यूज च्या रिपोर्टनुसार, Loong एअरलाइन्सची फ्लाइट 8528 च्या पायलटने या आपातकालीन स्थितीत विमान सेंट्रल चीनच्या हेनान प्रांताची राजधानी के झेंग्झो शीनझेंग इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरवलं. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 25 तारखेला फ्लाइटमध्ये 29 वर्षीय Li ने तिच्या भावनांवरील नियंत्रण सुटलं होतं.
नेमकं काय झालं होतं?
(Image Credit : DailyMail)
29 वर्षीय Li लूंग एअरलाइन्सच्या 8528 मध्ये प्रवास करत होती. कथितरूपाने Li ही तिच्या रिलेशनशिपबाबत निराश होती. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, महिला तिच्या सीटवर बसून रडत आहे. काही क्रू मेंबर्स आणि काही प्रवाशांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे सांगितले जात आहे की, तिच्या बॉयफ्रेन्डने तिला सो़डलंय.
तिने अर्धा लिटर दारू ढोसली होती
पोलिसांनी सांगितले की, महिलेने अर्धा लिटर Baijiu (चीनी मद्य) चं सेवन केलं होतं. ज्यात अल्कोहोलचं प्रमाण 35 ते 60 टक्के असतं. ही मद्याची अर्धा लिटरची बॉटल ती विमानात बसण्याआधीच प्यायली होती.
Zhengzhou पोलिसांनी सांगितले की, विमान कोणत्याही अडचणीशिवाय लॅन्ड झालं. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. महिलेला ताब्यात घेण्यात आलंय. तिच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण 160 मिली इतकं आढळून आलंय. पण या महिलेला कोणती शिक्षा मिळेल याबाबत माहिती सांगण्यात आलेली नाही.
धक्कादायक! जिवंत मासा तोंडात टाकून बनवला TikTok व्हिडीओ, घशात अडकल्याने गमावला जीव....