कोरोना व्हायरसच्या माहामारीत मेरठच्या मोदीपुरम परिसरातील पबरसा गावातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पबरसा गावातील खासगी रुग्णालयात या महिलेने आपल्या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. कोरोना व्हायरसचा कहर लक्षात घेता या जोडप्याने आपल्या जुळ्या मुलांची नावं सुद्धा तशीच ठेवली आहेत. एका मुलाचं नाव क्वारंटाईन तर दुसऱ्या मुलाचं नाव सॅनिटायजर ठेवलं आहे. लॉकडाऊनमध्ये या दोघांची नावं चर्चेचा विषय ठरली आहेत.
पबरसा गावातील रहिवासी धर्मेंद्र कुमार यांची पत्नी वेनू ही गरोदर होती. पल्लपपुरममध्ये या महिलेचे उपचार सुरू होते. शनिवारी रात्री प्रसवपीडांचा त्रास सुरू झाल्यामुळे धर्मेंद्रने महिला डॉक्टरांशी चर्चा केली, त्यावेळी त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कोरोनाच्या माहामारीमुळे महिला डॉक्टरने प्रसृती करण्यास नकार दिला.
त्यानंतर धर्मेंद्रने आपल्या पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात भरती केलं. डॉ. प्रतिमा थोमर यांनी या महिलेची प्रसुती केली. मग वेणू यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला . एका मुलाचं नाव क्वारंटाईन तर दुसऱ्या मुलाचं नाव सॅनिटायजर ठेवलं आहे. संपूर्ण रुग्णालयात या दोन जुळ्या मुलांची नावं चर्चेचा विषय ठरला आहे. या आधीसुद्धा एका महिलेने कोरोनाच्या महामारीच्या दरम्यान मृत्यू झाल्यामुळे आपल्या बाळाचं नाव कोरोना ठेवलं होतं. सोशल मीडियावर या बाळाच्या नावाची खूप चर्चा होती.
...म्हणे 'इथे' बकऱ्यांच्या विष्ठेने लाखो रुपये कमावतात; कसा होतो बकऱ्यांचा मालक लखपती?