तीन पतींसोबत एकाच छताखाली राहिली महिला, मुलीने शेअर केली कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 02:53 PM2021-07-01T14:53:08+5:302021-07-01T14:55:54+5:30

रकील सोयकाने सांगितलं की, ती १० वर्षांची होईपर्यंत तिला हे समजलंच नव्हतं की, तिचे खरे वडील कोण आहेत. आईसोबत एकाच घरात राहणारे तीन पुरूषांना ती बाबाच म्हणाली.

Woman grew up with three dads under one roof share story | तीन पतींसोबत एकाच छताखाली राहिली महिला, मुलीने शेअर केली कहाणी

तीन पतींसोबत एकाच छताखाली राहिली महिला, मुलीने शेअर केली कहाणी

Next

एका तरूणीने आपल्या परिवाराची अनोखी कहाणी शेअर केली आहे. रकील सोयका नावाच्या यूजरने टिकटॉक व्हिडीओत सांगितलं की, कशाप्रकारे तिची आई तीन पतींसोबत राहत होती. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या फॉलोअर्सने तिच्यावर प्रश्नांचा पाऊस पाडलाय. तिने हेही सांगितलं की,  तीन वडिलांसोबत राहत असताना ती कशी मोठी झाली.

रकील सोयकाने सांगितलं की, ती १० वर्षांची होईपर्यंत तिला हे समजलंच नव्हतं की, तिचे खरे वडील कोण आहेत. आईसोबत एकाच घरात राहणारे तीन पुरूषांना ती बाबाच म्हणाली. ती म्हणाली की, आजच्या काळात तिच्या परिवारात सामान्य असं काहीच नव्हतं. कारण सामान्यपणे परिवार एक आई, वडील आणि दोन मुले असा असतो.

ती म्हणाली की, एक आई आणि तीन वडिलांसोबत एकाच छताखाली राहण फार अजब होतं. तिने हा व्हिडीओतून हा खुलाला केला कारण तिला एका कॉलवर विचारण्यात आलं होतं की, एक आई आणि वडिलांसोबत राहून मोठं सामान्य होतं का? (हे पण वाचा : वाह रे वाह! पत्नीनेच पतीला दिली २ गर्लफ्रेन्ड्ससोबत लग्न करण्याची संमती; म्हणाला, "दुसरे माझ्यावर जळतात")

मिररच्या रिपोर्टनुसार, तिने सांगितलं की, माझ्या आईचे पहिले पती बिल, दुसरे पती रिच आणि माझे वडील पीट अनेक वर्षांपासून एकत्र राहतात. हे विचित्रच होतं. पण जेव्हा मी मित्रांकडे जात होते, तेव्हा पाहिलं की, काही मित्रांच्या आईंनी दुसरी लग्ने केली. त्या त्यांच्या पहिल्या पतींबाबत बोलतही होत्या.

रकीलने सांगितलं की, तिच्या आईने १७ वर्षांची असताना बिलसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलही होतं. नंतर रिच भेटल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. रिचसोबत घटस्फोट घेण्याआधी त्यांना दोन मुले झाली. (हे पण वाचा : 'या' अनोख्या कपलने बनवला अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड, जबरदस्त आहे त्यांची लव्हस्टोरी)

रकीलची आई ४४ वर्षांची असताना एका बारमध्ये गेली होती. तिथे तिची भेट पीटसोबत झाली. त्यांनी पीटसोबत लग्न केलं आणि रकीलचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर तिच्या आईने पुन्हा रिचसोबत लग्न केलं. त्यांनीच रकीलचा सुरूवातीला सांभाळ केला. 

हे एकत्र तेव्हा आले जेव्हा पीट आणि बिल यांना आरोग्यासंबंधी काही समस्यांचा सामना करावा लागला. त्यांची काळजी घेण्यासाठी मदतीची गरज होती. त्यामुळे रकीलच्या आईने आधीच्या दोन्ही पतींना रिचच्या परवानगीने आपल्यासोबत राहण्यास बोलवलं. रकीलने सांगितलं की, तिचे तिन्ही वडील कधीच भांडत नाहीत. जे काही वाद होतात ते तिची आणि प्रत्येक वडिलांमध्ये होतात.
 

Web Title: Woman grew up with three dads under one roof share story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.