डेटवर महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेली होती महिला, तरूणाने केलं असं काही तिचा मूड झाला खराब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 10:17 AM2023-08-05T10:17:17+5:302023-08-05T10:17:45+5:30
ती एका व्यक्तीसोबत डेटवर गेली होती. व्यक्तीने नकळत असं काही केलं जे महिलेला वाईट वाटलं आणि तिने त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
परदेशांमध्ये डेटिंग कल्चर खूप आधीपासून चालत आलं आहे. आता तर भारतातही काही प्रमाणात डेटिंग कल्चर बघायला मिळतं. लोक रिलेशनशिपमध्ये येण्याआधी एकमेकांसोबत थोडा वेळ घालवतात, कॉफी किंवा लंच-डीनरसाठी सोबत जातात. यादरम्यान ते एकमेकांचे स्वभाव-विचार जाणून घेत असतात. पण अनेकदा लोक दुसऱ्या व्यक्तीकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि जेव्हा त्या पूर्ण होत नाही तेव्हा त्यांना वाईट वाटतं. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ती एका व्यक्तीसोबत डेटवर गेली होती. व्यक्तीने नकळत असं काही केलं जे महिलेला वाईट वाटलं आणि तिने त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, मम्सनेट वेबसाइटवर एका महिलेने तिच्या डेटिंग अनुभवाबाबत सांगून सगळ्यांनाच अवाक् केलं. महिलेने सांगितलं की, ती नुकतीच एका व्यक्तीसोबत डेटवर गेली होती. पण तो कसा तिच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. ज्यामुळे तिने त्याच्यापासून दूर राहण्याचं ठरवलं. पण हे सांगून लोक तिला सपोर्ट करतील असं वाटलं, मात्र लोकांनी तिलाच ट्रोल केलं.
झालं असं की, महिलेची व्यक्तीसोबत भेट एका ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्मवर झाली होती. आधी ती त्याला तिच्या घराजवळच्या एका कॅफेमध्ये भेटायला गेली. यावेळी व्यक्तीने स्वत: बिल दिलं. बिल 1600 रूपये होतं. पहिली डेट चांगली झाल्याने महिलेने पुन्हा त्याच्यासोबत डेटवर जाण्याचं ठरवलं. तिथे दोघांनी डीनर केलं. ज्या रेस्टॉरंटमध्ये ते गेले होते तिथे जेवण महाग होतं.
महिलेने व्यक्तीला आधीच सांगितलं होतं की, आधीच्या डेटला त्याने बिल दिल्याने यावेळी ती बिल देणार. व्यक्तीही यासाठी तयार झाला. पण जेव्हा बिल आलं तेव्हा महिलेला धक्का बसला. बिल 11 हजार रूपये होतं. महिलेला वाटलं की, व्यक्तीही त्यात काही पैसे देईल, पण त्याने बिलाबाबत विचारलंही नाही. हेच महिलेला वाईट वाटलं. अशात तिच्या मनात त्या व्यक्तीविषयी राग निर्माण झाला होता. तिने ठरवलं की, ती त्या व्यक्तीसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही.
लोकांनी महिलेला केलं ट्रोल
जेव्हा तिने हे मम्सनेट वेबसाइटवर शेअर केलं तेव्हा लोकांनी तिला ट्रोल केलं. लोक म्हणाले की, महिलेला बिलाचे पैसे हवे होते तर तिने आधीच बिल देणार असं म्हणायला हवं नव्हतं. हे सगळं गैरसमजामुळे झालं. यात व्यक्तीची काही चूक नाही.