२६ लाखांची 'ही' वस्तू खरेदी करून महिला अडचणीत, खरेदी काय केलं हे वाचून उडालच!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:38 PM2019-06-03T14:38:14+5:302019-06-03T14:43:46+5:30
सामान्यपणे एका सामान्य व्यक्तीला २६ लाख रूपये कमवायला अनेक वर्षे लागतात. मग हे पैसे खर्च करण्याचा तर सोडाच पैसे बचत करण्यातच आयुष्य घालवतात.
(Image Credit : abcnews.go.com)
सामान्यपणे एका सामान्य व्यक्तीला २६ लाख रूपये कमवायला अनेक वर्षे लागतात. मग हे पैसे खर्च करण्याचा तर सोडाच पैसे बचत करण्यातच आयुष्य घालवतात. पण एक अशी महिला सध्या चर्चेत आली आहे, जिने केवळ एका दिवसात २६ लाख रूपये खर्च केलेत. पण आता तिच्या या कारनाम्यामुळे तिला कोर्टाचे खेटे घालावे लागण्याची शक्यता आहे.
(Image Credit : globalpunjabtv.in)
जमीरा हजियेव असं या महिलेचं नाव आहे. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, ही महिला भ्रष्टाचारी बॅंकर जहांगीर हजियेव(५७)ची पत्नी आहे. ही व्यक्ती भ्रष्टाराच्या आरोपात गेल्या १५ वर्षांपासून तुरूंगात शिक्षा भोगत आहे. हा व्यक्ती इंटरनॅशनल बॅंक ऑफ अजरबॅजानची माजी अध्यक्ष होता.
द टेलीग्राफनुसार, महिलेने लंडनच्या एका लक्झरी डिपार्टमेंटल स्टोर हॅरोड्समधून तब्बल २६ लाख रूपयांचे चॉकलेट खरेदी केलेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या स्टोरमध्ये एका चॉकलेटच्या डब्याची किंमत ५३ हजार रूपये इतकी आहे.
(Image Credit : storypick.com)
चॉकलेटची खरेदी करण्यासोबतच याआधी महिलेने हॅरोड्स स्टोरमधून ८ कोटी ८२ लाख रूपयांची खेळणी, दागिण्यांचे डिझायनर ब्राऊशर आणि कार्टियरमधून साधारण ५० कोटी रूपयांचे दागिणे सुद्धा खरेदी केलेत.
पण आता तिच्या या असामान्य लाइफस्टाइलमुळे ती संकटात सापडली आहे. या महिलेच्या उत्पन्नाचा स्त्रोत जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. कोर्टानेही या महिलेला विचारले आहे की, इतके पैसे खर्च करत असल्याने तिच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे.