कोरोना पॉझिटिव्ह महिलेकडे होते शेवटचे केवळ तीन दिवस, 'या' 'जादुई औषधाने' वाचवला तिचा जीव...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 10:39 AM2021-01-06T10:39:23+5:302021-01-06T10:39:38+5:30

शेफील्डला राहणारी ४५ वर्षीय क्लेअर हॅथ्रोन नॉर्थन नोव्हेंबरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. त्यांची तब्येत इतकी बिघडली होती की, काही दिवसात ती कोमात गेली होती.

A woman was only given three days but was saved after having an experimental drug | कोरोना पॉझिटिव्ह महिलेकडे होते शेवटचे केवळ तीन दिवस, 'या' 'जादुई औषधाने' वाचवला तिचा जीव...

कोरोना पॉझिटिव्ह महिलेकडे होते शेवटचे केवळ तीन दिवस, 'या' 'जादुई औषधाने' वाचवला तिचा जीव...

Next

इंग्लंडमध्ये एक महिला कोरोना पॉझिटिव्ह होती आणि अनेक आठवड्यांपासून कोमात होती. तिची स्थिती इतकी गंभीर होती की, डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, तिच्याकडे केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र, शेवटचा प्रयत्न म्हणून तिला दिलेल्या एका औषधाने फायदा झाला आणि तिचा जीव वाचला.

शेफील्डला राहणारी ४५ वर्षीय क्लेअर हॅथ्रोन नॉर्थन नोव्हेंबरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. त्यांची तब्येत इतकी बिघडली होती की, काही दिवसात ती कोमात गेली होती. ढासळती तब्येत बघता डॉक्टर्सनी क्लेअरला एक असं औषध दिलं जे सामान्यपणे आर्थरायटिसच्या रूग्णांना दिलं जातं. हेच औषध तिच्यासाठी रामबाण उपाय ठरलं.

अनेक आठवडे वेगवेगळे उपाय केल्यावरही या महिलेच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती. यानंतर ३ डिसेंबरला डॉक्टर्सनी शेवटचा प्रयत्न म्हणून एनाकीर्ना नावाचं एक औषध दिलं आणि याचा प्रभाव लगेच दिसला. ८ डिसेंबरला महिलेत सर्वात जास्त रिकव्हरी बघायला मिळाली आणि ११ डिसेंबरला ही महिला कोमातून बाहेर आली.

या महिलेच्या औषधांना हळूहळू कमी करण्यात आलं होतं आणि क्लेअरही या औषधाला प्रतिसाद देत जागी होत होती. ती हाताची हालचाल करू लागली होती. त्यानंतर ती शुद्धीवर आली. क्लेअरच्या परिवाराने अपेक्षा सोडली होती. मात्र जेव्हा त शुद्धीवर आली तेव्हा तिच्या परिवारातील लोक हैराण झाले. क्लेअरच्या १८ वर्षांच्या मुलीने या औषधाला 'जादुई औषध' म्हटलंय. तिच्यासाठी ख्रिसमस सरप्राइज आहे.

याआधी क्लेअरचा परिवार या व्हायरसला फार हलक्यात घेत होता. कारण त्यांच्या परिवारात कुणालाही कोरोना झालेला नव्हता आणि हेल्थ वर्कर म्हणून काम करणाऱ्या क्लेअरला सुद्धा कोणताही आजार नव्हता. मात्र, आता तिच्यार परिवारातील लोकांना जाणीव झाली आहे की, कोरोना किती घातक ठरू शकतो.
 

Web Title: A woman was only given three days but was saved after having an experimental drug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.