आपल्या जोडीदारापेक्षा 'या' प्राण्यासोबत झोपायला आवडतं महिलांना, सर्वेक्षणातून समोर आली बाब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:20 PM2021-09-07T13:20:03+5:302021-09-07T13:44:03+5:30

महिलांना कुत्रे फार आवडतात. त्यांचं आपल्या पाळीव कुत्र्यावर अत्यंत प्रेम असतं. याबाबत आता आणखी एक बाब समोर आली आहे. महिला आणि कुत्रा यांच नातं (dog and woman) यावर अलीकडेच अमेरिकेत (America) एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्याचं विश्लेषण केल्यानंतर आलेले निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत.

women sleep better with pet dogs than male partner American study reveal | आपल्या जोडीदारापेक्षा 'या' प्राण्यासोबत झोपायला आवडतं महिलांना, सर्वेक्षणातून समोर आली बाब

आपल्या जोडीदारापेक्षा 'या' प्राण्यासोबत झोपायला आवडतं महिलांना, सर्वेक्षणातून समोर आली बाब

googlenewsNext

पाळीव प्राण्यांचं (pet animals) आपल्या आयुष्यात खुप महत्त्व असतं. त्यांच्यासोबत केलेली मैत्री आयुष्यभर टिकते. पाळीव प्राणी घरात असल्यावर घरही हसतं खेळतं राहतं. पाळीव प्राण्यांची मैत्री आपल्याला मानसिकरित्याही फार मदत करते. कुत्रा (dog) हा देखील माणसाचा जीवाभावाचा दोस्त. त्यातही महिलांना कुत्रे फार आवडतात. त्यांचं आपल्या पाळीव कुत्र्यावर अत्यंत प्रेम असतं. याबाबत आता आणखी एक बाब समोर आली आहे. महिला आणि कुत्रा यांच नातं (dog and woman) यावर अलीकडेच अमेरिकेत (America) एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्याचं विश्लेषण केल्यानंतर आलेले निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत.

ज्यांच्या घरात पाळीव कुत्रे असतात, त्या घरातल्या महिलांचं कुत्र्यांवर खूप प्रेम असतं, हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं, अनुभवलेलं असतं; पण अमेरिकेत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असं आढळलं आहे की, महिलांना आपल्या जोडीदारापेक्षाही आपला पाळीव कुत्रा सोबत असताना अधिक चांगली झोप लागते. न्यूयॉर्कमधल्या प्रा. डॉ. क्रिस्टी हॉफमन प्राण्यांच्या स्वभावावर संशोधन करत आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष ऐकून पुरुषांना कदाचित थोडंसं वाईट वाटू शकतं; पण महिला मात्र ते ऐकून आनंदी होतील. डॉ. क्रिस्टी यांनी आपल्या टीमला सोबत घेऊन ९२६ अमेरिकीन महिलांशी संवाद साधला. त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला, की महिलांना आपला जोडीदारापेक्षा पाळीव कुत्र्यासोबत असताना चांगली झोप लागते.

जेव्हा महिलांच्या कुशीत किंवा शेजारी त्यांचा कुत्रा झोपलेला असतो, तेव्हा महिला सर्वांत खूश असतात आणि अगदी शांतपणे झोपतात. कारण महिलांमध्ये माणसांपेक्षाही आपला कुत्रा सोबत असताना सुरक्षित असल्याची भावना अधिक तीव्र असते. त्यांच्यासोबत त्या अगदी आरामात असतात. कुत्रे अधिक चांगले बेड पार्टनर ठरू शकतात. कारण कुत्रे माणसांच्या झोपेच्या चक्रानुसार आणि वेळापत्रकानुसार आपलं वेळापत्रक अ‍ॅडजस्ट करू शकतात. मात्र माणसांचं तसं नसतं. ते आपल्याच वेळेनुसार झोपतात. 

या सर्वेक्षणात कुत्रा आणि मांजर यांच्यातही तुलना करून काही निष्कर्ष काढण्यात आले. त्यातही कुत्र्यांचंच पारडं जड ठरलं. कारण अनेक महिलांनी सांगितलं की, मांजरांचं झोपेचं वेळापत्रकही माणसांसारखंच विचित्र असतं. ती आपल्या मालकाच्या झोपेच्या वेळापत्रकाप्रमाणे स्वतःला अ‍ॅडजस्ट करत नाहीत.

अर्थात, सर्वेक्षणाचा हा निष्कर्ष प्रत्येक महिलेला लागू होऊ शकत नाही, असं डॉ. क्रिस्टी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, की चांगली झोप लागण्यासाठी कुत्रा सोबत असणं एवढं एकच कारण पुरेसं ठरू शकत नाही. कुत्रे रात्री अनेकदा मूत्रविसर्जनासाठी उठतात. त्यामुळे झोपमोड होऊ शकते. तसंच, त्यांचे केसही गळतात. या गोष्टी काही जणींना आवडत नाहीत.

Web Title: women sleep better with pet dogs than male partner American study reveal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.