युद्धादरम्यान नेमकं काय होतं, सैनिक कसे जगतात, कसे बचाव करतात अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता सामान्य लोकांमध्ये असते. युद्धावर आधारिक अनेक सिनेमांमध्ये ते बघायलाही मिळतं. अनेकांना सैनिकासारखं जीवन अनुभवण्याची ईच्छा असते. अशात तुम्ही त्यांचं जीवन अनुभवण्यासाठी त्यांच्या बंकरमध्ये राहू शकता. यांमध्ये दुसऱ्या महायुद्धातील सैनिक राहत होते. पण हे बंकर खरेदी करण्यासाठी मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल.
दुसऱ्या महायुद्ध काळातील बंकर लिलाव करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला आहे. इथे Surrey मध्ये असलेले बंकर लिलाव केले जाणार. ज्यांची किंमत 2 कोटी रूपये लावण्यात आली आहे. इतिहासातील एका भीषण युद्धाचे साक्षीदार असलेले हे बंकर 2.1 एकर जंगलासोबत मिळतील.
द इवनिंग स्टॅंडर्डनुसार, सध्या इथे कोणत्याही डेव्हलपमेंटची परवानगी नाही. आता या ठिकाणाकडे लोक येऊ लागले आहेत. त्यांना येथील गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. येथील बंकर विकण्याचा प्रयत्न गेल्यावर्षी सुद्धा करण्यात आला होता. पण 300,000 पाउंडमध्ये खरेदी करण्यासाठी यात कुणी इंटरेस्ट दाखवला नाही. त्यामुळे आता हे बंकर आजूबाजूच्या जमिनीसोबत विकण्याचा प्लान समोर आला आहे. ज्यानंतर काही लोक यात इंटरेस्ट दाखवत आहेत.
असं मानलं जातं की, हे बंकर Foxwarren Experimental Department चे असतील. जो युद्ध काळातील एक गुप्त प्रोजेक्ट राहिला असेल. इथे नव्या वेपन्सचे प्रोटोटाइम डेव्हलप केले जात असतील. असंही मानलं जातं की, बाउंसिंग बॉम्ब इन्व्हेंशन करणारे Barnes Wallis जवळच प्रयोग करत असतील. सध्या हे बंकर Foxwarren बंकर नावाने ओळखले जातात. जे Cobham जवळ आहेत. असंही मानलं जात आहे की, हे बंकर Dambusters रेडशी संबंधित असतील. ज्यांची यावर्षीय किंमत 165,000 पाउंड ठेवण्यात आली आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 1,7247734 रूपये इतकी होते.