हिंदू धर्मात भगवान विष्णूंना खूप मानाचं स्थान असून लोक भगवान विष्णूंच्या वेगवेगळ्या रुपांची पुजा करतात. भारतात जागोजागी भगवान विष्णूंची मंदिरं, मुर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचा वाचून विश्वास बसणार नाही पण भगवान विष्णूंची सगळ्यात उंच मुर्ती भारतात नाही तर एका मुस्लिमबहुल देशात आहे. म्हणजेच ही भव्य मुर्ती इंडोनेशियात आहे. विशेष म्हणजे ही मुर्ती तयार करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले होते.
भगवान विष्णूंची ही मुर्ती जवळपास १२२ फुट उंच आणि ६४ फुट रुंदीची आहे. तांबे आणि पितळ या धातुंपासून ही मुर्ती तयार करण्यात आली आहे. ही मुर्ती तयार करण्यासाठी एक दोन नाही तर २६ वर्षांचा कालावधी लागला होता. २०१८ मध्ये ही मुर्ती संपूर्ण बनून तयार झाली. जगभरातील लोक ही मुर्ती पाहण्यासाठी येतात.
ही मुर्ती तयार करण्यामागे जुना इतिहास आहे. असं म्हणतात की, १९७९ मध्ये इंडोनेशियातील मुर्तीकार बप्पा न्यूमन नुआर्ता यांनी भव्य मुर्ती तयार करण्याचे स्वप्न पाहिले. एकअशी मुर्ती जी जगभरात कोणीही तयार केली नसेल. बघणारा या मुर्तीला पाहतच राहील अशी मुर्ती तयार करावी असं त्यांना वाटत होतं.
असं मानलं जातं की, १९८० मध्ये एक कंपनी तयार केली होती. ज्याद्वारे मुर्ती तयार करण्याचं कामकाज पाहिलं जात होतं. म्हणजेचं मुर्त्यांची रचना कशी असावी. मुर्तीसाठी खर्च होणारा पैसा कसा उभा करता येईल. हे पाहिलं जात होतं. पण हा विचार करण्यात अनेक वर्ष निघून गेली. शेवटी मोठ्या प्लॅनिंगनंतर मुर्ती तयार करण्याचं काम १९९४ मध्ये सुरू करण्यात आलं.
इंडोनिशियातील शासनाने ही मुर्ती तयार करण्यासाठी मदतीचा हात दिला. अनेकदा बजेट कमी असल्यामुळे काम थांबवण्यात आलं. २००७ ते २०१३ पर्यंत मुर्ती तयार करण्याचं काम थांबत थांबत सुरू होते. त्यानंतर जेव्हा ही मुर्ती तयार करण्याचं काम सुरू झालं. ते पूर्ण झाल्यानंतरच थांबले.
उंगासनचे रहिवासी असणारे या भव्य मुर्तीचे मुर्तिकार बप्पा न्यूमन नुआर्ता यांना भारत सरकारकडून सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी त्यांनी पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. सध्या या मंदिराची ख्याती जगभर पसरलेली आहे. जगभरातील लोक मुर्तीचे पाहण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात.
मोठ्या कुटुंबातील लोकांना कोरोनाचा धोका जास्त? जाणून घ्या अफवा आणि फॅक्ट्स....
'या' अवयवांना सतत हात लावणं ठरू शकतं कोरोना संक्रमणाचं मोठं कारणं; 'अशी' घ्या काळजी