मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 02:48 PM2017-10-24T14:48:54+5:302017-11-09T19:33:17+5:30

कोणतंही काम हे हलकं नसतं, ते स्वच्छ मनाने करावा आणि एवढा पगार मिळणार असेल तर काय प्रश्नच नाही.

You will be shocked to hear the salary of Mukesh Ambani's driver | मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Next
ठळक मुद्देआता प्रत्येक चालकाने त्यांच्या गाडीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.मुकेश अंबानींच्या कामगारांना आणि अधिकाऱ्यांना किती पगार असेल हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. त्यांच्या मालकीच्या जवळपास ५०० हून अधिक गाड्या आहेत.

जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत असलेल्या मुकेश अंबानी यांच्या कंपनीतल्या कामगारांना आणि अधिकाऱ्यांना किती पगार असेल हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो. एवढ्या गर्भश्रीमंत माणसाकडे निदान ड्रायव्हर म्हणून तरी आपण काम केलं पाहिजे असं प्रत्येक सामान्य माणासाला वाटत असेल. पण तुम्हाला माहितेय का त्यांच्याकडे ड्रायव्हर निवडीसाठीही फार मोठी प्रक्रिया पार करावी लागते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल इतका मोठा पगार त्याच्या कामगारांना असतो.
सध्या त्यांच्या ड्रायव्हरच्या पगाराविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. त्यामुळे सगळ्यांचेच डोळे  मोठे झाले आहेत. त्यांच्या ड्रायव्हरलाच जर एवढा पगार असेल तर त्यांच्या त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांना किती पगार असेल. 


या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मुकेश अंबनीच्या एका ड्रायव्हरला जवळपास २ लाखांहून अधिक पगार आहे. त्यांच्या मालकीच्या जवळपास ५०० हून अधिक गाड्या आहेत. त्या प्रत्येक गाडीवर ड्रायव्हर निवडीसाठी मुकेश अंबानी यांनी एका कंपनीला कंत्राट दिलं आहे. हे कंत्राटदार ड्रायव्हरसाठी परिक्षा घेतात, परिक्षेत पास झालेल्या ड्रायव्हरला पुन्हा प्रशिक्षण दिलं जातं. त्यानुसार त्यांची नियुक्ती केली जाते. सामान्यतः कोणत्याच गाडीचालकाला एवढा पगार नसतो. मात्र मुकेश अंबानीच्या चालकाचा एवढा पगार ऐकून आता प्रत्येक चालकाने त्यांच्या गाडीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
फोटो  सौजन्य - khabar.ndtv.com

Web Title: You will be shocked to hear the salary of Mukesh Ambani's driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.