टिकटॉक व्हिडीओ बनवण्याच्या नादात आतापर्यंत कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण अजूनही लोक यातून काही शिकत नाहीयेत. आता टिकटॉकमुळे बंगळुरूतील एका तरूणाला आपला जीव गमावला. येथील 22 वर्षीय तरूणाने जिवंत मासा गिळण्याचा व्हिडीओ शटू करत होता. यादरम्यान त्याचा मृत्यु झाला.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
AajTak ने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या होसुरमध्ये एका तरूण तलावात मासे पकडायला गेला होता. तिथे त्याला जिवंत मासा गिळंकृत करतानाचा व्हिडीओ करण्याची आयडिया आली. व्हिडीओ शूट करताना तो मासा गिळंकृत करत होता आणि याच दरम्यान मासा तरूणाच्या घशात अडकला.
मासा घशात अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. जेणेकरून मासा निघेल म्हणून त्याच्या मित्राने त्याला पोटावर झोपवलं. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.
त्याचे मित्र तरूणाला एका सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओ तयार करण्याआधी तरूणाने मित्रांसोबत मद्यसेवनही केलं होतं.
पोलिसांनी याप्रकारणी अनैसर्गिक मृत्युचा तक्रार नोंदवली. तसेच त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण टिकटॉक स्टार होता आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी तो जिवंत मासा गिळण्याचा प्रयत्न करत होता. पण यात त्याला जीव गमवावा लागला.