Video : नवीन Jaguar कार देण्यास वडिलांनी दिला नकार, बिघडलेल्या मुलाने नदीत ढकलून दिली BMW कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 12:35 PM2019-08-10T12:35:23+5:302019-08-10T12:44:03+5:30

श्रीमंत बापाच्या बिघडेल लेकाचा कारनामा सगळीकडे गाजतोय.

Youth Pushes Luxury BMW in River after father denies New Jaguar Car Request | Video : नवीन Jaguar कार देण्यास वडिलांनी दिला नकार, बिघडलेल्या मुलाने नदीत ढकलून दिली BMW कार!

Video : नवीन Jaguar कार देण्यास वडिलांनी दिला नकार, बिघडलेल्या मुलाने नदीत ढकलून दिली BMW कार!

Next

काही लोकांच्या डोक्यात श्रीमंतीची इतरी हवा असते की, ते काय करताहेत हेही त्यांना माहीत नसतं. त्यांना श्रीमंतीचा दिखावा करणं इतकंच काय ते माहीत असतं. आता ही पंजाबच्याहरयाणातील घटनाच बघा ना...पंजाब म्हटलं की, डोळ्यांसमोर उभं राहतं ते हिरवेगार शेत आणि रस्त्यावर धारणाऱ्या महागड्या लक्झरी गाड्यांचं चित्र. तरूण इथे लक्झरी गाड्यांचा वापर करतात. पण मनासारखं झालं नाही म्हणून एका तरूणाने जो कारनामा केला, त्याची चर्चा सगळीकडे होत आहे.

हरयाणाच्या यमुनानगरमध्ये सध्या एका श्रीमंत बापाच्या लाडक्या लेकाचा कारनामा चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एका तरूणाने त्याची BMW कार रागारागात नदीत ढकलून दिली. कारण काय तर त्याच्या वडिलांनी त्याला Jaguar कार दिली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएमडब्ल्यू कार नदीत दूरपर्यंत वाहून गेली आणि एके ठिकाणी अडकून थांबली. या तरूणाच्या वडिलांना ही घटना कळाली तर कार बाहेर काढण्यासाठी काही लोकांना पाठवले. पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ड्रायव्हरला विचारपूस सुरू केली.

या घटनेतील वडील आणि मुलाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण श्रीमंत बापाच्या बिघडेल मुलाच्या या कारनाम्याने सगळेच हैराण झाले आहेत. हरयाणातील तरूणांमध्ये बीएमडब्ल्यू, जगुआर, ऑडी यांसारख्या महागड्या गाड्यांची चांगलीच क्रेझ आहे. अनेकजण आपली श्रीमंती दाखवण्यासाठीही महागड्या गाड्या वापरतात. असंच काहीसं या तरूणाला करायचं होतं. मात्र, नंतर रागावलेल्या मुलाला वडिलाने जगुआर कार दिली की नाही हे अजून समजले नाही. 

 

Web Title: Youth Pushes Luxury BMW in River after father denies New Jaguar Car Request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.