नवी दिल्ली : जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. क्रीडामंत्री व राष्टÑीय संघटनेने या स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातून एक पथक वाघा बॉर्डरमार्गे लाहोरमध्ये पोहोचले आहे. पाकिस्तानमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेत भारत सहभागी झाल्याचे सोशल मीडियाद्वारे समजले.
या स्पर्धेतील सामने लाहोर, फैसलाबाद व गुजरात येथे होणार आहेत. क्रीडा मंत्रायलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही खेळाडूला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिलेली नाही. भारतीय हौशी कबड्डी संघटनेचे प्रशासक निवृत्त न्या. एस. पी. गर्ग यांनीही संघटनेने कोणत्याही संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले,‘आम्हाला पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या कोणत्याही संघाची कल्पना नाही.’ कबड्डी संघटनेने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी कोणत्याही संघाला परवानगी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परदेशात होणाºया स्पर्धेची सूचना राष्टÑीय संघटना क्रीडा मंत्रालयाला देते. त्यानंतर या दौºयाला मंजूरी देण्यासाठी परराष्टÑ व गृह मंत्रालयाला पत्र लिहिले जाते. पाकिस्तानच्या पंजाबचे क्रीडामंत्री राय तैमूर खान भट्टी यांनी लाहोर येथील एका हॉटेलमध्ये भारतीय पथकाचे स्वागत केले. जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१० व २०१९ मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती. भारताने आतापर्ययत झालेल्या सहाही स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यात २०१०, २०१२, २०१३ व २०१४ मध्ये या स्पर्धेत भारताने पाकला नमवले. या स्पर्धेतील विजेत्याला एक कोटी तर उपविजेत्याला ७५ लाखांचे बक्षिस देण्यात येईल. (वृत्तसंस्था)