खूशखबर: Pro Kabaddiचे सामने मुंबईतच, फायनलचा मानही मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 09:11 AM2018-08-23T09:11:09+5:302018-08-23T10:34:48+5:30
Pro kabaddi लीगचे यू मुंबा संघाचे सामने अन्यत्र हलवण्यात येणार असल्याच्या चर्चा गेले कित्तेक दिवस सुरू होत्या. वरळी येथील NSCIचे भाडे परवडत नसल्याने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात होते.
मुंबई - प्रो कबड्डी लीगचे यू मुंबा संघाचे सामने अन्यत्र हलवण्यात येणार असल्याच्या चर्चा गेले कित्तेक दिवस सुरू होत्या. वरळी येथील NSCIचे भाडे परवडत नसल्याने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे मुंबईतील कबड्डी चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर होता, परंतु त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. प्रो कबड्डीच्या सहाव्या सत्रातील यू मुंबाच्या लढती आपल्या मुंबईतच होणार आहेत. त्यात डबल धमाका म्हणजे प्ले ऑफ आणि फायनलचा मानही मुंबईला मिळाला आहे. त्यामुळे कबड्डी चाहते भलतेच खूश झाले आहेत.
प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ५ ऑक्टोबर पासून ही लीग सुरू होत आहे. १३ विविध शहरांमध्ये या लीगचे सामने खेळवण्यात येतील आणि ५ जानेवारी २०१९ ला अंतिम सामना मुंबईत होणार आहे. सहाव्या पर्वाचा पहिला सामना तेलगू टायटन्स आणि तामिळ थलायवा यांच्यात होणार आहे. दुसऱ्या सामन्यात कॅप्टन कूल अनुप कुमारचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. मागील पाच सत्र यू मुंबासोबत असलेला अनुप यंदा जयपूर पिंक पँथर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे आणि त्यांचा पहिला मुकाबला यू मुंबाविरुद्ध आहे.
याशिवाय तामिळ थलायवाविरूद्ध पाटणा पायरेट्स यांच्या सामन्यात प्रदीप नरवालचा खेळ पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. असे असेल प्रो कबड्डीचे वेळापत्रक
1⃣3⃣ venues
— ProKabaddi (@ProKabaddi) August 22, 2018
1⃣2⃣ teams
7⃣5⃣ days of action-packed kabaddi
Here's how the kabaddi bandwagon will take over the country come #VivoProKabaddi Season 6! pic.twitter.com/7Zfxb1UhpJ