लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून महावितरणने थकबाकीदार ग्राहकांसह वीजचोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. आता तर १ ते ३० युनीटपर्यंत ज्यांचा वापर असेल असे ग्राहकही महावितरणच्या रडारवर आहेत. महावितरण अशा ग्राहकांकडे संशयास्पद समजत असून त्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे. महावितरणने कमी युनिट जळत असलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत तपासणी पूर्ण करायची आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात १ ते ३० युनिटदरम्यान वापर आहे. अशांची यादी तयार करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणने विशेष मोहीम आखली आहे. कंपनीचे कर्मचारी अशा ठिकाणी भेट देणार आहेत. मागील काही दिवसापासून महावितरणने थकबाकी वसुल करणे सुरु केले आहे. विशेषत: थकबाकी असलेले शासकीय कार्यालय, नळयोजना तसेच पथदिव्यांचीही वीज कट करण्यात येणार आहे.
थकबाकीदार निशाण्यावरजिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हे ग्राहकही सध्या महावितरणच्या निशाण्यावर आहे. विशेष म्हणजे, ज्यांची वीज कट केली आहे, त्यांनी परिसरातून कुठून वीज घेतली आहे का, याबाबतची तपासणी केली जात आहे. विशेषत: थकबाकीदारांकडे महावितरणने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
थकीत बिलn चंद्रपूर-गडचिरोली मंडलातील घरगुती ग्राहकांकडे ४९ कोटी ५७ लाख, वाणिज्यिक ग्राहकांकडे १० कोटी ५५ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ८ कोटी ८७ लाख, सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहकांकडूनही ६ कोटी ५४ लाख येणे ऑक्टोबर महिन्यामध्ये बाकी होते.
चंद्रपूर परिमंडळाकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येकांकडे विविध इलेक्ट्रिक साधणे आली आहे. असे असतानाही काही ठिकाणी १ ते ३० युनिट आढळून येत आहे. त्यामुळे अशा ग्राहकांची तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे.-सुनील देशपांडे, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडल
...तर होणार गुन्हा दाखलवीज चोरी करताना पकडल्यास वीज वापर तसेच दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. जे भरणार नाही त्यांच्यावर महावितरण गुन्हा दाखल करणार आहे. अशा ग्राहकांकडे महावितरणची विशेष नजर असून जिल्ह्यात पथकही गठित करण्यात आलेआहे.