भारताच्या पुरुष कबड्डी संघाने बांगलादेशचा ४४-१९ असा पाडाव करीत साखळीत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. काठमांडू-नेपाळ येथे सुरू असलेल्या “१३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत” भारतीय पुरुष कबड्डी संघाने या विजया बरोबरच विजयी घोडदौड कायम राखली आहे.
पहिल्या सत्रात २८-०८ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या भारताने दुसऱ्या सत्रात देखील दमदार खेळ केला. प्रदीप, दीपक हुड्डा, अमित, नवीन, सुरेंद्र यांच्या चढाई-पकडीचा दमदार खेळामुळे भारताचा हा विजया सोपा झाला. भारताचा शेवटचा साखळी सामना दुबळ्या नेपाळ संघाशी होईल.
पुरुषांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात पाकिस्तानने नेपाळला ५४-२२ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठण्याच्या आशा जीवंत ठेवल्या. पण त्यांचे भविष्य श्रीलंका बांगलादेश या सामन्यावर अवलंबून आहे. या सामन्यात श्रीलंका पराभूत झाला तर गुण सरासरीवर अंतिम फेरीत भारताबरोबर कोण खेळणार हे ठरविण्यात येईल. श्रीलंका जिंकली तर ते उपविजेते ठरून अंतिम फेरीत दाखल होतील.