५०० प्राध्यापक व संशोधकांचा आॅनलाईन सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 02:27 PM2020-05-02T14:27:40+5:302020-05-02T14:30:19+5:30
कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष कोल्हापूर व आय. आय. टी. मुंबई यांच्या ...
कोल्हापूर: विवेकानंद महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष कोल्हापूर व आय. आय. टी. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राध्यापक विकास कार्यक्रम अंतर्गत आॅनलाईन मुडल लर्निंग अँड मॅनेजमेंट सिस्टम वर प्रशिक्षणात देशभरातील शिक्षण संस्था मधील जवळपास ५०० च्या वर प्राध्यापक व संशोधक मुडल लर्निंग अँड मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत प्रशिक्षण घेतले.
शिक्षक आॅनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात, गृहपाठ देऊ शकतात, परीक्षा घेऊ शकतात, मार्क देऊ शकतात. सदर प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना पण लॉगिन दिले जाते, ते कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणावरून शिक्षकांनी दिलेले काम पूर्ण करू शकतात. आॅनलाईन मुडल प्रणालीद्वारे २५ ते ३० एप्रिल असा पाच दिवसात हा उपक्रम राबविण्यात आला. मुडल हि एक विना मूल्य मुक्तस्रोत शिक्षण व्यवस्थापन प्रणाली आहे.