ठाणे जिल्ह्यातील १४१ आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर होणार

By अनिकेत घमंडी | Published: September 8, 2022 03:53 PM2022-09-08T15:53:38+5:302022-09-08T15:54:00+5:30

ठाणे जिल्ह्यातील आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना राबविण्यात येणार आहे.

141 tribal villages in Thane district will be converted into ideal villages | ठाणे जिल्ह्यातील १४१ आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर होणार

ठाणे जिल्ह्यातील १४१ आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर होणार

googlenewsNext

डोंबिवली: 

ठाणे जिल्ह्यातील आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना राबविण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत गावांमध्ये सविस्तर आराखडे तयार करण्याची सुचना केली. जिल्ह्यातील १२१ गावांची निवड झाली असून या योजनेसाठी केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाकडून २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी बैठकीत दिली.

अनुसूचित जमातीची म्हणजे आदिवासी समाजाची जास्त लोकसंख्या असलेल्या गावांचा आदर्श गाव संकल्पनेवर आधारित एकात्मिक, सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील १२१ गावांची निवड झाली आहे. त्यात शहापूर तालुक्यातील ४४, भिवंडीतील ३६, मुरबाडमधील २५, अंबरनाथमधील १० व कल्याणमधील एका गावाचा समावेश असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर।केले. 

दरवर्षी एकपंचमांश गावांचा विकास केला जाणार असून, पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने सर्व गावांचा विकास केला जाणार आहे. या गावांमध्ये योजनेची परिणामकारकरित्या अंमलबजावणी करण्यासाठी  पाटील यांनी विशेष बैठक घेतली. केंद्राच्या इतर विभागाकडील योजना व राज्य सरकारच्या योजनांचे अभिसरणाच्या (कन्वर्जन) माध्यमातून आदिवासी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीकोनातून विकास आराखडे तयार करण्याच्या सुचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिल्या. या वेळी आमदार दौलत दरोडा, आदिवासी विभागाच्या शहापूर प्रकल्प अधिकारी आर. एच. किल्लेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक दीपक कुटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आदिवासींची लक्षणीय लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांद्वारे मुलभुत व पायाभुत सुविधा पुरविल्या जातील. त्याचबरोबर ग्रामस्थांचे आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रस्ते, दुरसंचार सुविधा, अंगणवाडी केंद्रे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कौशल्य वृद्धी कार्यक्रम, सामुदायिक वन विकास, वनधन कार्यक्रम, जलस्त्रोताचे संरक्षण आदी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या गावांचा आदर्श गाव म्हणून उदय होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील गावांचा विकास करण्यासाठी महसुली गावानुसार आराखडा तयार करावा. आराखडा मंजूर झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या विकासयोजनांची सांगड घालून गावामध्ये योजना राबवावी. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आदिवासींच्या प्रगतीचा ध्यास : कपिल पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदिवासी गावांच्या विकासाबरोबरच आदिवासी माणसाच्या प्रगतीचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार देशभरात प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना राबविण्यात येत आहे. देशातील ३ हजार ६०५ गावांचा पाच वर्षांत विकास केला जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: 141 tribal villages in Thane district will be converted into ideal villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.