केडीएमसीच्या डॉक्टर पत्नी पत्नीची लाखो रुपयांची फसवणूक चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Published: December 5, 2022 06:27 PM2022-12-05T18:27:23+5:302022-12-05T18:27:29+5:30

शहराच्या पश्चिम भागातील बेतूरकरपाड्यातील दोन गाळे विकलेले असताना त्याची विक्री करुन फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

A case has been registered against four people for defrauding KDMC's doctor wife of lakhs of rupees | केडीएमसीच्या डॉक्टर पत्नी पत्नीची लाखो रुपयांची फसवणूक चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

केडीएमसीच्या डॉक्टर पत्नी पत्नीची लाखो रुपयांची फसवणूक चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

कल्याणशहराच्या पश्चिम भागातील बेतूरकरपाड्यातील दोन गाळे विकलेले असताना त्याची विक्री करुन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. रजिस्ट्रेशन करीत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या दोन डॉक्टर पती पत्नीला चार जणांनी लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात चार जणांच्या विरोधात फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहनदास एस. पटेल, जतीन मोहनदास पटेल, अंकित मोहनदास पटेल आणि मनसुख वसानी अशी आहेत. फिर्यादी पुरुषोत्तम टिके हे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. ते त्याठिकाणी प्रमुख पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा टिके या देखील महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसूती गृहाच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत. या दोन्ही पती पत्नी डॉक्टरांची आरोपीनी फसवणू केली आहे. बेतरकरपाडय़ात दोन गाळे संजय पेटल यांनी राजेशकुमार शर्मा याला विकलेले असताना त्याची विक्री केली. पुरुषोत्तम टिके यांना दोन्ही गाळे १ कोटी ४५ लाख रुपये किंमतीला विकले या गाळ्य़ांचे रजिस्ट्रेशन केले. त्या बदल्यात डॉ. प्रज्ञा टिके यांच्याकडून ५६ लाख ९० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणूक करणा:या चार जणांच्या विरोधात फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका हद्दीत रेरा आणि महापालिका यांची फसवणूक केल्या प्रकरणी ६५ बिल्डरांची एसआयटी आणि ईडीकडून चौकशी सुरु आहे. बेकायदेशीरपणे घरांचे रजिस्ट्रेशन केले जात असल्याची बाब या फसवणूक प्रकरणात उघड झाली. टिके डा’क्टर पत्नी पत्नीच्या गाळा देखील दुसऱ््याला विकला असता त्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. यावरुन बेकायदेशीर रजिस्ट्रेशन प्रक्रिया केली जात असून त्यात सामान्यांची फसवणूक सुरुच आहे. हे यातून उघड झाले आहे.

काही दिवसापूर्वी पुण्यातील एका महिलेने डोंबिवलीतील निवृत्त प्राध्यापिका उज्जवला करंडे यांची अशी लाखो रुपयांची फसवणू केली होती. या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही. उच्चशिक्षित असलेल्या व्यावसायिकांना फसवणूकीचे टारगेट करुन फसविले जात आहे. हेच या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे. 

Web Title: A case has been registered against four people for defrauding KDMC's doctor wife of lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.