दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेनं राबवला स्तुत्य उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 10:09 PM2021-10-25T22:09:32+5:302021-10-25T22:09:47+5:30
युवासेनेतर्फे शहरांतील महापूरुषांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली.
कल्याण- दिवाळीसण काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यानं सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने युवासेनेतर्फे एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
युवासेनेतर्फे शहरांतील महापूरुषांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. युवासेनेच्या या उपक्रमाचं कौतुक होत असून नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केलं जातंय. कल्याणडोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी महापुरुषांचे स्मारक आणि पुतळे उभारण्यात आले आहेत. तर दिपावली सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे.
दिवाळीमध्ये सर्वच जण आपले घर आणि आपल्या परिसराची साफसफाई करीत असतो. त्याचप्रमाणे आपल्या शहरातील महापुरुषांचे पुतळे आणि स्मारक परिसरही स्वच्छ असला पाहीजे या उद्देशाने युवासेनेतर्फे ही संकल्पना आयोजित केल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली. आशु सिंह यांनी दिली. युवासेनेतर्फे यापूढेही महापुरुषांच्या स्मारक स्वच्छतेची जबाबदारी सांभाळली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आल आहे.