"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही"

By मुरलीधर भवार | Published: September 10, 2022 08:59 PM2022-09-10T20:59:02+5:302022-09-10T20:59:33+5:30

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार सुप्रिया सुळे यांना टोला.

bjp leader minister targets ncp supriya sule on cm eknath shinde comment | "सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही"

"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही"

googlenewsNext

"कल्याण-अतिशय व्यवस्थित प्रशासन सुरु आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता. त्यामुळे सुप्रिया ताई म्हणाल्या दोन दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. ताई तुम्ही काळजी करु नका. हे सरकार पण चालवित आहे आणि फिरतात पण," असा टोला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने परिसरातील किर्तनकारांचा जाहिर सत्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थि होते.

आमची राज्यात अडीच वर्षे सत्ता नव्हती. विश्वासघातामुळे आमचे सरकार आले नव्हते. आत्ता आमचे सरकार आले. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले नाही. जे घडायचे असते ते घडते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झटपट निर्णय घेणारे आहे. कोल्हापूरचे शाहू महाराजांनी ज्या सामाजिक सुधारणेच्या गोष्टी गेल्या. त्यांनी झटपट निर्णय घेऊन समाजाला न्याय दिला. त्याच धर्तीवर आमचे सरकार काम करीत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणासोबत स्कील डेव्हलपमेंटवर जीवनदीप कॉलेजने भर दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना फंड देऊ. अतिशय दुर्गम भागात संस्थेचे अध्यक्ष घोडविंदे यांनी शिक्षण संस्था उभी केली. या भागातील विद्यार्थ्यांची गरज पाहता या भागाला लॉ कॉलेज दिले आहे. ग्रामीण भागात आर्टस सायन्स, बीएस्सीचे शिक्षण घेऊन काय होणार नाही. ती एक समाजाची छोटी गरज आहे. या विषयांचे ज्ञान आणि त्याला स्कील डेव्हलपमेटंची जोड दिल्यास एका बाजूने तरुण बुद्धीमान होईल तर दुसऱ्या बाजूने त्याला रोजगार मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: bjp leader minister targets ncp supriya sule on cm eknath shinde comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.