केडीएमसीच्या बाजार परवाना विभागाने चिकन मटण; विक्रेत्यांकडून वसूल केला ५० हजार रुपयांचा दंड
By मुरलीधर भवार | Published: January 17, 2024 06:59 PM2024-01-17T18:59:11+5:302024-01-17T18:59:25+5:30
ब आणि क प्रभाग क्षेत्रातील मांस विक्रेत्यांच्या दुकानावर सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे आणि राजेश सावंत यांनी धाड टाकून तपासणी केली.
कल्याण- जनावरांच्या मासांची विक्री करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाजार परवाना विभागाकडून परवाना घेतला पाहिजे. ज्या दुकानदारांनी परवाना घेतला नाही. तसेच ज्यांनी परवाना घेतला असून नुतनीकरण केले नाही अशा दुकानदारांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ब आणि क प्रभाग क्षेत्रातील मांस विक्रेत्यांच्या दुकानावर सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे आणि राजेश सावंत यांनी धाड टाकून तपासणी केली. या तपासणीत १० चिकन विक्रेत्यांनी तसेच ७ विक्रेत्यांनी त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण केले नसल्याचे आढळून आले. या १७ जणांकडून ३८ हजार रुपयाचा दंड वसूल केला होता. याशिवाय १२ विक्रेत्यांनी महापालिकेचा परवानाच घेतला नव्हता. त्यांच्याकडून १२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. ज्या चिकन व मटण विक्रेत्यांनी तातडीने परवान्याचे नुतनीकरण करावे तसेच ज्या विक्रेत्यांनी अद्यापही परवाना काढलेला नाही अशा विक्रेत्यांनी तातडीने परवाना काढण्यात यावा, असे आवाहन मालमत्ता विभागाच्या उपायुक्त आयुक्त वंदना गुळवे यांनी केले आहे. अशा प्रकारच्या कार्यवाही सातत्य ठेवले जाणार आहे.