कल्याण-डोंबिवली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने हळूहळू निर्बंधही वाढवण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. उद्याच्या शनिवारपासून या आदेशांची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Weekend lockdown imposed in kalyan dombivali after corona cases increased)राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय या आठवड्यात कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या आकड्यांनी दररोज नवनविन रेकॉर्ड केले आहेत. कोरोना संख्येत अचानक झालेली ही वाढ पाहता केडीएमसी प्रशासनानेही त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यासह हॉटेल - बार आणि रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी एलएनएनशी बोलताना दिले आहेत. तसेच मॉल्सलाही सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून नियमांचे उल्लंघन किंवा गर्दी झाल्यास मॉल सील केला जाईल असा इशाराही पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिला. "लोक सांगूनही ऐकत नाहीत, मग लॉकडाऊन हाच पर्याय", छगन भुजबळांनी दिला अल्टिमेटम
होळी-रंगपंचमीसाठी पथक तैनातदरम्यान वाढत्या कोरोना आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यालाही मनाई करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात 4-5 पथके तैनात करण्यात येणार असून या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचाही पुनरुच्चार आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी एलएनएनशी बोलताना केला.
केवळ या सेवा राहणार सुरू-अत्यावश्यक सेवा, मनुष्य आणि प्राण्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल, वैद्यकीय सेवा, किराणा दुकाने, दूध डेअरी, वृत्तपत्रे आणि पेट्रोल पंप