कल्याण-कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत र्निबध लागू आहेत. मात्र काल शनिवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील काही दुकाने, हॉटेल आणि बार उघडी होती. ही दुकाने सील करण्याची कारवाई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार केली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील दीपक हॉटेल, दीक्षा बार आणि डोंबिवलीतील बंदीश पॅलेस बार, साई पूजा बार सील करण्याची कारवाई केली आहे. पुन्हा लिंक रोडवरील सिरॅमिक दुकाने, मोमीन टेलीकॉम मोबाईल दुकाने देखील सील करण्यात आली. त्याचबरोबर सर्व प्रभागातील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली.