सार्वजनिक शौचालयाची नियमित पाहणी करण्याचे आयुक्तांनी  दिले निर्देश ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 06:23 PM2021-07-14T18:23:46+5:302021-07-14T18:24:28+5:30

KDMC News: चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर दिला आहे.

KDMC Commissioner instructs regular inspection of public toilets! | सार्वजनिक शौचालयाची नियमित पाहणी करण्याचे आयुक्तांनी  दिले निर्देश ! 

सार्वजनिक शौचालयाची नियमित पाहणी करण्याचे आयुक्तांनी  दिले निर्देश ! 

Next

कल्याण -  महापालिका क्षेत्रात लोकसंख्येची जास्त घनता चाळ परिसर व झोपडपट्टी परिसरात आहे. या परिसरात राहणारे नागरिक प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात आणि या सार्वजनिक शौचालयांमार्फत कुठल्याही संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही .  याकरीता चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर दिला असून महापालिकेच्या सर्व विभागिय उपायुक्तांना सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची नियमित पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत . तसेच उपआयुक्तांनी केलेल्या शौचालयांच्या पाहणीच्या वेळेस आढळून आलेल्या अस्वच्छ शौचालयांची साफसफाई प्रभागातील आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या देखरेखीखाली करुन घेण्यात येत असल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात आले आहे.

महापालिकेच्या 10 प्रभागात एकुण 419 शौचालयात4292 सिटची सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दलितवस्ती सुधारणे अंतर्गत अजून 38 शौचालय(एकुण 249 सिट) उभारण्याचे काम सुरु असून त्यापैकी 28 शौचालयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित 10 शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या दैनंदिन साफसफाईसाठी मे. जनसेवा सुविधा संस्था यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत साफसफाई केली जाते.या संस्थेने प्रभागनिहाय शौचालयांची माहिती घेऊन शौचालयांच्या सदयस्थितीबाबतचा अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. त्‍या अनुषंगाने नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्ती संदर्भातील निविदा काढण्यात आली असून ही निविदा कार्यवाहीत आहे. महापालिका परिसरात पे ॲण्ड युज ची एकुण 26 शौचालये(एकुण 235 सिट) असून या शौचालयांच्या साफसफाईसाठी नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत तेथील दैनंदिन साफसफाई करण्यात येते.

Web Title: KDMC Commissioner instructs regular inspection of public toilets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.