“१ आमदार १ खासदाराच्या मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे,आमच्या मतदारसंघात छदाम दिलेला नाही”

By प्रशांत माने | Published: December 5, 2022 11:45 PM2022-12-05T23:45:28+5:302022-12-05T23:47:12+5:30

मनसे आमदार राजू पाटील यांनी  व्यक्त केला संताप 

mns mla raju patil said smart city works in the constituency of 1 mla and 1 mp no single rupee has been given in our constituency | “१ आमदार १ खासदाराच्या मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे,आमच्या मतदारसंघात छदाम दिलेला नाही”

“१ आमदार १ खासदाराच्या मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे,आमच्या मतदारसंघात छदाम दिलेला नाही”

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

डोंबिवलीः केडीएमसी क्षेत्रात २ खासदार आणि ४ आमदार आहेत. परंतु १ आमदार आणि १ खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे सुरु असून आमच्या मतदारसंघात एक रुपयाचा  छदाम ही  दिलेला नाही अशा शब्दात मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी ठाणे जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीच्या  बैठकीत संताप व्यक्त केला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

स्मार्ट सिटी या महत्वाकांक्षी योजनेत केडीएमसीचा  समावेश करण्यात आला आहे. सध्या  स्मार्ट सिटीच्या विकास कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. मात्र अन्य आमदारांच्या मतदारसंघांना वगळून एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात ही काम सुरू असल्याकडे आमदार  पाटील यांनी लक्ष वेधले. 

त्यांच्यासह  कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी ही फक्त ठराविक मतदारसंघांकडे लक्ष देऊन अन्य विधानसभा क्षेत्रांकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत बैठकीत  नाराजी व्यक्त केली.          

अमृत योजनेच्या कामांचे ऑडिट होणार !

केडीएमसी क्षेत्रातील २७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेचं काम सुरू आहे. मात्र हे काम करत असताना ठेकेदाराने रस्ते खोदून जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे  रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे संबंधीत ठेकेदाराच्या कामांचे  देखील ऑडिट करण्याची मागणी  आमदार पाटील यांनी या बैठकीत केली. त्यानुसार या कामांचे  लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल असे केडीएमसीकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. स्थानिक आमदारांना घेऊन सुरु असलेल्या कामांचा दौरा करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी प्रशासनाला  दिल्या.                  

कल्याण रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम ब्रिजचे काम हे धीम्या गतीने सुरु आहे. या पुलाची उभारणी हि रेल्वे कडून करण्यात येणार असून त्या संबंधातील रक्कम मनपाकडून रेल्वेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र या संदर्भात रेल्वेकडे पाठपुरावा केला जात नसल्याबाबत आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. 

केडीएमसी,एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हे काम संथ गतीने सुरु असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर तातडीने  केडीएमसी पाठपुरावा करेल असं आश्वासन मनपा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांच्याकडून  देण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mns mla raju patil said smart city works in the constituency of 1 mla and 1 mp no single rupee has been given in our constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.