कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदारांची घेतली एमएमआरडीएसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:12 PM2021-07-12T20:12:46+5:302021-07-12T20:13:16+5:30
Shrikant Shinde News: कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा 40 कोटी रुपये खर्चाचा एलीव्हेटेड पूल आणि नेवाळी नाक्यावरील उड्डाणपूल यांना गती देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
कल्याण- कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहाड उड्डाणपूलाचे चौपरीकरण, कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा 40 कोटी रुपये खर्चाचा एलीव्हेटेड पूल आणि नेवाळी नाक्यावरील उड्डाणपूल यांना गती देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आज एमएमआरडीए आयुक्तांसोबत मुंबई कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीस कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणो, दीपेश म्हात्रे आणि राजेश मोरे आदी उपस्थित होते. (MP Shrikant Shinde holds meeting with MMRDS to resolve Kalyan-Dombivali traffic congestion)
खासदार शिंदे यांनी सांगितले की, कल्याण मुरबाड नगर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या मार्गावरील वालधूनी पूल चौपदरी झाला आहे. शहाड येथील रेल्वे उड्डाणपूल हा दुपरी आहे. या पूलाचे चौपदरीकरण करण्याची मागणी एमएमआरडीएकडे करण्यात आले. त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएने महापालिका आयुक्तांना दिले आहे. डीपीआर तयार झाल्यावर पूलाच्या बांधणीकरीता किती खर्च होईल हे स्पष्ट होणार आहे.
त्याचबरोबर कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा एलीव्हेटेट 4क्क् कोटी रुपयांचा पूल तयार करण्यात येणार आहे. कल्याण पूना लिंक रस्त्यावरुन विठ्ठलवाडी येथून थेट हा पूल कल्याण पश्चिमेतील भवानी चौकात उतरणार आहे. त्याचा डीपीआर तयार आहे. त्याची रेल्वेकडून डीएडी मंजूरी आवश्यक आहे. हा पूल तयार झाल्यावर कल्याण पूर्व पश्चिम गाठण्यासाठी होणा:या वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे असे खासदार शिंदे यांनी सांगितले .
कल्याण मलंग रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. हा रस्ता अंबरनाथ शीळ रस्त्यास नेवाळी नाक्यावर मिळतो. नेवाळी नाक्यावरी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्याठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांकडे केली आहे. त्याचाही डीपीआर लवकर तयार केला जाणार आहे.
गेल्याच महिन्यात खासदार शिंदे यांनी कल्याण दुर्गाडी ते टिटवाळा रिंग रोड प्रकल्पाची पाहणी केली होती. हा रिंग रोड जिथे संपतो त्याठिकाणाहीन पुढे मुरबाड गोवेली नाक्यावर रस्ता नेण्याकरीता त्याचाही डीपीआर तयार करण्यात यावा. टप्पा क्रमांक आठ तयार केला जावा असे शिंदे यांनी सांगितले. याशिवाय मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी हा रिंग रोडचा तिसरा टप्पा आहे. त्यासाठी 83 टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे तिस:या टप्प्याची निविदा काढावी अशी मागणी केली असता येत्या आठवडय़ात निविदा काढली जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काटई ते मोठा गाव ठाकूर्ली हा रिंग रोडचा तिसरा टप्पा आहे. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी सुरु करावी असे एमएमआरडीेने सूचित केले आहे असे शिंदे यांनी सांगितले.
हे सगळे प्रकल्प सुरु होऊन मार्गी लागल्यास कल्याण डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी सूटण्यास मदत होईल. पत्री पूल, वडवली पूल आणि दुर्गाडी खाडी पूलाचे काम झाले आहे. मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पुलाचे काम प्रगती पथावर आहे. त्याच बरोबर रिंग रोड, शहाड उड्डाणपूल, कल्याणचा एलिव्हेटेट पूल आणि आणि नेवाळी उड्डाणपूल झाल्यास चहूबाजूंनी ठाणो, मुरबाड नगर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि अंबरनाथ बदलापूर शहरांशी कनेक्टीव्ही वाढणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.