कल्याणच्या सुर्यकांतने पटकावला भारत श्री किताब
By सचिन सागरे | Published: September 11, 2022 04:01 PM2022-09-11T16:01:06+5:302022-09-11T16:02:03+5:30
कल्याणमधील सूर्यकांत विश्वासराव जाधव यांनी भारत श्री किताब पटकवत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे.
सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : बेंगलोर येथे नुकत्याच पार पाडलेल्या 70 व्या भारत श्री या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत देशातील 14 राज्यातील 188 निवडक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांच्यावर मात करत कल्याणमधील सूर्यकांत विश्वासराव जाधव यांनी भारत श्री किताब पटकवत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे.
कर्नाटकच्या पृथ्वीराज आणि तामिळनाडूच्या मनीकंदनवर मात करीत त्यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे.पश्चिमेतील गांधारी येथील स्वःताच्या व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून त्यांनी फिटनेसचे धडे देत बरेच नवतरून शरीर सौष्ठवासाठी तयार केले आहेत. शरीर सौष्ठव हा खेळ अत्यंत खर्चिक आहे. त्यासाठी लागणारा आहार हा सामान्य माणसाला, न परवडणारा आही.
सामान्य कुटुंबातील असलेल्या सुर्यकांतने आपल्या परिस्थितीवर मेहनतीने मात करत अव्वल ठरला आहे. सुर्यकांतला खेळाची आवड लहानपणापासूनच होती. खेळासाठी बँकेची नोकरी सोडून पूर्णपणे शरीर सौष्ठव या खेळाकडे लक्ष दिले.