डाेंबिवली : २६/११ च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात ज्या शूरवीर जवान, पोलिसांना त्यांचा जीव गमवावा लागला, त्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अमर रहे अमर रहे शहिद जवान अमर रहे... अशा घोषणा देण्यात आल्या.
डोंबिवली पोलिसांच्या वतीने सर्व शहिदांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्य प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा गांधी चौकात केले होते. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, महापौर विनीता राणे, नगरसेवक विश्वनाथ राणे, नितीन पाटील, आयएमएच्या डॉ. अर्चना पाटे, भाजपचे नंदू परब, मनपाचे अतिक्रमण हटाव पथकप्रमुख बाजीराव आहेर आदींसह मान्यवर उपस्थित होते. आदरांजली कार्यक्रमानंतर कोरोनाकाळात ज्यांनी प्राधान्याने काम करून कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचा सन्मान करण्यात आला.
राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार त्यानिमित्ताने अहोरात्र झटणाऱ्या राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा व वाहतूक पोलिसांचा यावेळी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामान्य नागरिकांसह सफाई कामगार, रिक्षाचालक आदींनी उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीयत्व, एकात्मतेची भावना व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.