त्या लहानग्याचा आवाज केडीएमसीपर्यंत पोहचणार का ?
By मुरलीधर भवार | Published: September 10, 2022 09:34 PM2022-09-10T21:34:34+5:302022-09-10T21:35:11+5:30
कल्याण-गेल्या चार दिवसापासून संध्याकाळी मूसळधार पाऊस पडतो.
कल्याण-गेल्या चार दिवसापासून संध्याकाळी मूसळधार पाऊस पडतो. याचा फटका नागरिकांना बसत आहे. मात्र कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील संत तुकारामनगरात पावसामुळे नागरिकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी साचत आहे. घाण पावसासोबत कचरा घरात येतो. घरातील वस्तू खराब झाल्या आहेत.
त्या लहानग्याचा आवाज केडीएमसीर्पयत पोहचणार का ? pic.twitter.com/cTlLeLhpp9
— Lokmat (@lokmat) September 10, 2022
एका घरात पाणी शिरल्याने लहान मुलाचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. घरात पाणी शिरल्याचा चौथा दिवस आहे. गुडघ्या इव्हढे पाणी भरले आहे. केडीएमसीला काही कळत नाही. घरातील सामान खराब झाले आहे या लहानग्या सवाल तरी केडीएमसीच्या कानापर्यंत पोहचणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.