"शरद "च्या प्रसाद रायमानेला 1 कोटी 10 लाख शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:45+5:302021-01-16T04:29:45+5:30

नांदणी गावच्या शेतकरी कुटुंबातील प्रसाद रायमाने सुरुवातीपासूनच परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय बाळगून होता. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ...

1 crore 10 lakh scholarship to Prasad Raimane of "Sharad" | "शरद "च्या प्रसाद रायमानेला 1 कोटी 10 लाख शिष्यवृत्ती

"शरद "च्या प्रसाद रायमानेला 1 कोटी 10 लाख शिष्यवृत्ती

googlenewsNext

नांदणी गावच्या शेतकरी कुटुंबातील प्रसाद रायमाने सुरुवातीपासूनच परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय बाळगून होता. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याने इंटरनॅशनल इंग्लिश लॅंग्वेज टेस्टिंग सिस्टिम परीक्षा उत्तीर्ण झाला. ‘शरद’मधील इनोव्हेशन व लर्निंग सेंटर, व्हॅल्यू ॲडेड प्रोग्रॅम, शरद पॅटर्नमुळे त्याची ॲडव्हान्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी (एम.एस.) 35 लाख रुपयाच्या शिष्यवृत्तीसह निवड झाली होती.

त्याची एम.एस. नंतर कार्डिफ युनिव्हर्सिटीमध्येच 1 कोटी 10 लाख रुपयांसह पीएच.डी.साठी निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, महालक्ष्मी ॲकॅडमीचे अभय केळकर, प्रा. शितल पाटील, प्रा. सुमित बरडीया यांचे सहकार्य लाभले.

Web Title: 1 crore 10 lakh scholarship to Prasad Raimane of "Sharad"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.