यशवंत बँकेकडून सभासदांना १० टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:31 AM2021-09-16T04:31:12+5:302021-09-16T04:31:12+5:30
यशवंत बँकेचा विक्रमी २०५ कोटींचा व्यवसाय अध्यक्ष एकनाथ पाटील कोपार्डे : अहवाल सालात यशवंत सहकारी बँकेने २०५ कोटींचा ...
यशवंत बँकेचा विक्रमी २०५ कोटींचा व्यवसाय
अध्यक्ष एकनाथ पाटील
कोपार्डे : अहवाल सालात यशवंत सहकारी बँकेने २०५ कोटींचा विक्रमी टप्पा पूर्ण केला असून, बँकेला १ कोटी २१ लाख ५२ हजार रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश देणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी जाहीर केले. कुडित्रे येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात यशवंत बँकेची ४७ वी ऑनलाइन वार्षिक सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष तोडकर, कार्यकारी संचालक भाऊसाहेब कांबळे, संभाजी पाटील, विकास पाटील उपस्थित होते. अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले, बँकेने अहवाल वर्षात २०५ कोटींचा व्यवसाय करताना १२५ कोटींच्या ठेवी, ७८ कोटी कर्ज वाटप करताना निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून १७ कोटींची कर्जे वाटप केली आहेत. त्या एकही कर्ज थकबाकीत नाही. बँकेला मोबाइल बँकिंगची परवानगीही मिळाली असून, बँक पश्चिम महाराष्ट्रातील सहकारातील मोबाइल बँकिंगची सुविधा मिळणारी पहिली बँक असल्याचे सांगितले. यावेळी मनोहर पाटील यांनी अण्णासाहेब महामंडळाच्या कर्जावर एक टक्का व्याज कमी करण्याची सूचना केली.
150921\1659-img-20210915-wa0104.jpg
कुडित्रे ता करवीर येथील यशवंत सहकारी बँकेच्या 47 व्या वार्षिक सभेत अध्यक्ष एकनाथ पाटील बोलताना शेजारी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर कार्यकारी संचालक भाऊसो कांबळे व सर्व संचालक