कोल्हापूर : जिल्हा बँकेशी संलग्न असणाऱ्या पाच साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे उसाची बिले देण्यासाठी १०३ कोटी ६० लाखांच्या कर्जास मंजुरी दिल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कर्ज मंजुरीमुळे ३० सप्टेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेशी संलग्न भोगावती (परिते), आजरा, छत्रपती राजाराम (कसबा बावडा), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री), हिरण्यकेशी या कारखान्यांचे सॉफ्ट लोन व गॅप लोनचे प्रस्ताव बॅँकेकडे होते. त्यांच्याकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेतल्यानंतर पाच कारखान्यांना १०३ कोटी ६० लाख ५८ हजार रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला पंजाब नॅशनल बँकेकडून १७ कोटी तर आप्पासाहेब नलवडे कारखान्याला युनियन बँकेकडून आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. उर्वरित कारखाने हे राज्य बँकेसह विविध राष्ट्रीयीकृत बँकांशी संलग्न असल्याने त्यांनाही कर्ज उपलब्ध झाले आहे. दरम्यान, ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी बँकेने प्रयत्न सुरू केले आहेत; पण कारखान्यांवर खरेदी कर थकबाकी १५ कोटी त्याचबरोबर एनसीडीसी व एसडीएफ या केंद्रीय वित्तीय संस्थांचे थकबाकी आहे. या थकीत कर्जाचे हप्ते पाडून देण्याबाबत बॅँकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी काही कंपन्यांची आहे. यासाठी आम्ही सहकारमंत्री चंद्रकांतदादा यांच्याकडे मागणी केली आहे. कारखान्याचा हंगाम महिना-दीड महिन्यांवर आल्याने अर्थमंत्री, प्रधान सचिव आदी प्रमुखांची बैठक बोलावण्याची विनंती आम्ही केल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक ए. वाय. पाटील, भैया माने, संतोष पाटील उपस्थित होते. असे मिळणार कारखानानिहाय कर्ज-कारखाना सॉफ्ट लोन अतिरिक्त खेळते भांडवल एकूण कर्जेभोगावती १८, ६१, ६२००० १९, ३,७००० ३७,६४,६९००० आजरा ६,९७,८८००० १०,२८,५५००० १७,२६,४३००० राजाराम १२,४,१०००० २,३५ लाख १४,३९,१००००बिद्री २०,६८,१२००० - २०,६८,१२००० हिरण्यकेशी १३,६२,२४००० - १३,६२,२४०००
जिल्हा बँकेकडून पाच कारखान्यांना १०३ कोटींचे कर्ज : हसन मुश्रीफ
By admin | Published: September 22, 2015 1:07 AM