शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

जिल्हा बँकेकडे सेवा संस्थांचे १४६ कोटी अडकले

By admin | Published: September 22, 2015 9:17 PM

जिल्ह्यात १८५६ सेवा संस्था : भागभांडवलावर गेल्या सहा ते सात वर्षांपासून लाभांश नाही

 प्रकाश पाटील - कोपार्डे -पीक कर्जासाठी सेवा संस्थांना पतपुरवठा करणाऱ्या जिल्हा बँकेकडून एकूण कर्जावर भागभांडवल म्हणून पाच टक्के रक्कम घेतली जाते. या भागभांडवलापोटी जिल्ह्यातील १८५६ संस्थांचे १४६ कोटी ६९ लाख रुपये जिल्हा बँकेत अडकले आहे. यावर लाभांशही मिळत नसल्याने सेवा संस्थांचे पाय खोलातच जात असल्याचे मत सहकारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अल्प दरातील कर्जाचा पुरवठा करण्यासाठी त्रिस्तरीय पद्धत आहे. ‘नाबार्ड पीक कर्जासाठी जिल्हा बँकांना पतपुरवठा करते, तर जिल्हा बँका सेवा संस्थांना पतपुरवठा करतात. सेवा संस्थांमार्फत खातेदार सभासदांना प्रतिएकर ३४ हजार रुपये दिले जातात. एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी, तर एक ते दोन लाखाला दोन टक्के व दोन लाखांवरील पीक कर्जाला चार टक्के व्याज आकारणी होते. पंजाबराव देशमुख कृषी कर्ज व्याज सवलतीतून शेतकऱ्यांना परतावा केला जातो. यामुळे सेवा संस्थेच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून, सेवा संस्थेच्या तोट्यात वर्षानुवर्षे वाढ होत आहे. याचा परिणाम जिल्ह्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ९६५ संस्था तोट्यात गेल्या आहेत, तर ८७२ संस्थाच नफ्यात आहेत.सेवा संस्था शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करताना जिल्हा बँकेच्या नियमानुसार एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम भागभांडवल म्हणून कपात करतात. ही वर्षानुवर्षे सुरू असलेली कपात यावर्षीच्या अहवाल सालात १४६ कोटी ६९ लाखांवर पोहोचली आहे. गेली सहा ते सात वर्षे यावर एक पैसाही लाभांश या संस्थांना जिल्हा बँकेने दिलेला नसून कोट्यवधींची रक्कम बिनव्याजीच वापरली जाते. त्यामुळे तोट्यातील संस्थांना संजीवनी द्यायची असेल तर या रकमेचा केवळ सहा टक्के लाभांश काढला तरी नऊ ते दहा कोटी रुपये सेवा संस्थांना मिळणार आहेत. मात्र, तोट्यात असलेल्या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे कारण पुढे करून लाभांश देता येत नाही, हे कारण सांगणाऱ्या जिल्हा बँक प्रशासनाकडून इतर खर्चासाठी (त्याची वर्गवारी नाही) एक कोटी ७९ लाख ४५ हजार १0 रुपये खर्च होतात. यावेळी रिझर्व्ह बँकेचे नियम कुठे जातात? असा प्रश्न संस्थाचालकांतून विचारला जात आहे. तुमच्या चैन्या; मात्र शेतकऱ्यांना उत्तरे देताना आमचा जीव गुदमरतोय, अशी प्रतिक्रिया एका सचिवाने आपले नाव जाहीर न करण्याच्या बोलीवर दिली. जर लाभांश दिला गेला तर किमान नोकरांचे पगार व स्टेशनरी तरी भागवता येईल. तसेच संस्थांना थोडातरी दिलासा मिळेल, असेही सांगण्यात आले.सहकारी सेवा संस्था जिल्हा बँकेकडून कर्ज घेताना भागभांडवल वसूल करते. मात्र, यावर लाभांश दिला जात नाही. इतर राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतल्यास सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांना मिळते. जिल्ह्यातील सेवा संस्थांचे कोट्यवधी रुपये विनाकारण भागभांडवलच्या नावाखाली जिल्हा बँकेत पडून आहेत. यावर बँक आपलाच व्यवसाय करत आहे.- एन. सी. पाटील, अध्यक्ष, हनुमान विकास सेवा संस्था पाटपन्हाळा, ता. पन्हाळा