शित्तूर-वारुण आरोग्यवर्धिनी केंद्रात १५९६ जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:23 AM2021-03-25T04:23:38+5:302021-03-25T04:23:38+5:30
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथील आरोग्यवर्धिनी केंद्र अग्रेसर असून, २४ मार्च म्हणजे आजअखेर १५९६ नागरिकांना लसीकरणाचा ...
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथील आरोग्यवर्धिनी केंद्र अग्रेसर असून, २४ मार्च म्हणजे आजअखेर १५९६ नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेतल्याची माहिती आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियदर्शनी दाईंगडे यांनी दिली.
दररोज किमान १५० लोक या आरोग्य केंद्रात लस घेत आहेत.
शित्तूर-वारुणसह उखळू, शिराळे-वारुण, खेडे, सोंडोली, थावडे, जांबुर, मालगाव, कांडवण आदी गावांतील नागरिक लसीकरणासाठी या आरोग्यवर्धिनी केंद्रात येत आहेत. सुमारे २६०० लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत जवळजवळ १५२७ लोकांनी पहिला डोस, तर ६९ फ्रंटवर्कर्संनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे.
लसीकरणाच्या मोहीम यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका परिश्रम घेत आहेत.