जिल्हा परिषदेचे १९ मतदारसंघ खुले

By admin | Published: September 21, 2016 12:58 AM2016-09-21T00:58:35+5:302016-09-21T01:07:23+5:30

रचना अंतिम टप्प्यात : २० जागा सर्वसाधारण महिलांसाठी

19 constituencies of Zilla Parishad open | जिल्हा परिषदेचे १९ मतदारसंघ खुले

जिल्हा परिषदेचे १९ मतदारसंघ खुले

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे १९ मतदारसंघ हे सर्वसाधारण गटासाठी राहणार असून २० मतदारसंघ हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरले आहेत. जिल्हा परिषदेच्या गट आणि गणाची रचना अंतिम टप्प्यात आली असून मंगळवारी पहाटेपर्यंत दोष-दुरूस्ती करून हा अहवाल घेऊन पुण्याला खास कर्मचारी रवाना करण्यात आला आहे.
२३ सप्टेंबरपर्यंत मतदारसंघांच्या रचनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांपैकी ३९ जागा सर्वसाधारण गटासाठी असून त्यातील २० जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर १९ जागा सर्वसाधारण गटांसाठी आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण ९ जागा असून त्यातील ५ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकच जागा आरक्षित आहे. इतर मागासवर्गीय गटासाठी १८ जागा असून त्यातील ९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. पंचायत समितीचे एकूण १३४ गण असून त्यातील ४२ मतदारसंघ खुले असून ३६ मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी १९ मतदारसंघ आरक्षित असून त्यातील ११ महिलांसाठी व ९ सर्वसाधारण राहतील. पंचायत समितीसाठी अनुसूचित जमातीचा मतदारसंघ नाही. इतर मागासवर्गीय गटासाठी ३७ मतदारसंघ आरक्षित आहेत व त्यातील २० महिलांसाठी आरक्षित असून १७ सर्वसाधारणसाठी आहेत.
२३ सप्टेंबरला मतदारसंघ रचना अंतिम करण्यात येईल. त्यानंतर ५ आॅक्टोबरला ताराराणी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषदेसाठी तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीसाठीची आरक्षण सोडत निघेल.

२० आॅक्टोबरपर्यंत हरकती
मतदारसंघाची रचना आणि आरक्षण या दोन्हीसाठी १० ते २० आॅक्टोबर या कालावधीत हरकत घेता येणार आहे. या हरकतींची विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होईल. २५ नोव्हेंबरला याबाबत गॅझेट प्रसिद्धी केले जाईल.


पहाटेपर्यंत दोष-दुरुस्तीचे काम
गेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या मतदारसंघांच्या रचनेचा अहवाल पुण्याला पाठविण्यात आला होता. त्याचा बारकाईने अभ्यास करून त्यातील काही त्रुटी काढण्यासाठी हा प्रस्ताव पुन्हा कोल्हापूरला पाठविण्यात आला. त्यावर मंगळवारी पहाटेपर्यंत काम करून खास माणूस पुन्हा पुण्याला मंगळवारी सकाळीच पाठविण्यात आला असून यावर आता दोन दिवसांत शिक्कामोर्तब होणार आहे.

Web Title: 19 constituencies of Zilla Parishad open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.