कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२१९ रुग्ण सापडले असून, ४० जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर शहरात तब्बल ५४६ जणांना लागण झाली असून चाचण्या वाढवल्याने रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. १ हजार ६५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोल्हापूर शहरापाठोपाठ हातकणंगले तालुक्यात ३७४ आणि करवीर तालुक्यात २९८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गगनबावड्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून जादा चाचण्या करून कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्याची पध्दत अवलंबली जात आहे.
गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कोरोना मृतांचा आकडा कमी म्हणजे ४० वर आला आहे. यामध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक सात रुग्ण मृत्यू पावले असून कोल्हापूर श्हारात सहा तर शिरोळ तालुक्यात प्रत्येकी सात जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू
करवीर ०७
प्रयाग चिखली, खुपिरे, उजळाईवाडी, निगवे दुमाला, हिरवडे खालसा, हसूर दुमाला, भामटे
कोल्हापूर ०६
बेलबाग, शिवाजी पेठ, कसबा बावडा, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, कसबा बावडा
शिरोळ ०७
औरवाड, शिरदवाड २, हेरवाड, यड्राव, जयसिंगपूर, जुने दानवाड
हातकणंगले ०४
कबनूर, हुपरी २, तारदाळ
गडहिंग्लज ०४
सांबरे, वाघराळी, कडाल, शिप्पूर
इचलकरंजी ०२
बंडगर मळा, इचलकरंजी
राधानगरी ०१
मजरे कासारवाडा
कागल ०१
मांगनूर
भूदरगड ०१
खेडगे
शाहूवाडी ०१
कडवे
पन्हाळा ०१
सावर्डे
इतर ०५
जकादेवी, बुधगाव, चिपळूण, बत्तीस शिराळा, माळशिरस