३०टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येथे दहा वर्षांपूर्वी 'जलयुक्त शिवार' अभियान यशस्वीपणे राबविले. त्यामुळे महिनाभर
पाऊस लांबला तरी केनवडेला पाणीसाठा
पुरेल इतका पाणीसाठा जलस्रोतांत होत आहे.
गावच्या उत्तरेला १९७२ मध्ये ९ एफसीएफटी क्षमतेचा पाझर
तलाव जिल्हा परिषदेकडून बांधण्यात आला; परंतु यामध्ये मुबलक पाणीसाठा
होत नव्हता. २००३ मध्ये या तलावाची उंची वाढविण्यासाठी आमदार हसन
मुश्रीफ यांनी सहकार्य केले. त्यानंतर लघुपाटबंधारे विभागानेही लक्ष घातल्याने हे काम मार्गी लागले.
दरम्यान, चार हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाला पिण्यासाठी जूनअखेर पाणी पुरवठा होऊ शकेल इतका पाणीसाठा आहे. तसेच या तलावाखालील विहिरींच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे.
कोट...
"दहा वर्षांपूर्वी सरपंच असताना
राळेगणसिद्धी, हिवरेबाजार येथील जलस्रोतनिर्मिती पाहिली. त्यांचा आदर्श घेऊन तलावातील जलस्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा लाभ आता होत आहे.
- दत्ता पाटील, माजी सरपंच
कॅप्शन
केनवडे येथील तलावात असणारा पाणीसाठा
छाया-दत्तात्रय पाटील म्हाकवे