५० गुणासाठी ४० गुणांचा पेपर--मूल्यमापन चाचणीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:05 AM2017-11-11T01:05:19+5:302017-11-11T01:06:32+5:30

कोल्हापूर : शिक्षण खाते संकलित मूल्यमापन चाचणी वेळेत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर आता प्रश्नपत्रिका काढतानाही गोंधळ कायम ठेवला आहे.

 40 marks paper for 50 times - Confusion in evaluation test | ५० गुणासाठी ४० गुणांचा पेपर--मूल्यमापन चाचणीत गोंधळ

५० गुणासाठी ४० गुणांचा पेपर--मूल्यमापन चाचणीत गोंधळ

Next
ठळक मुद्देगुणदानात वाढ करण्याचा उपायपरिपत्रकानुसार सुधारित गुण देण्याचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले

वीरकुमार पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिक्षण खाते संकलित मूल्यमापन चाचणी वेळेत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर आता प्रश्नपत्रिका काढतानाही गोंधळ कायम ठेवला आहे. शुक्रवारी (दि. १०) मराठी माध्यमातील ७ वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची (तृतीय भाषा) प्रश्नपत्रिका ५० ऐवजी ४० गुणांची मिळाली. ही चूक लक्षात आल्यावर प्रश्नपत्रिका बदलण्याऐवजी याच प्रश्नपत्रिकेसाठी ५० गुण द्यावेत, असा आदेश काढून परीक्षेच्या हेतूलाच हरताळ फासला.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून १ ली ते ८ वी पर्यंत तीन चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येत आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांच्या लेखी परीक्षेसाठी ५० व तोंडीसाठी १० गुण आहेत. ही चाचणी बुधवार (दि. ८) पासून सुरू झालेली आहे. शुक्रवारी मराठी माध्यमाचा इंग्रजीचा पेपर झाला. हा पेपरही ५० गुणांचा, पण प्रश्नपत्रिका मिळाली ४० गुणांची. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला.+++

प्रश्न क्र. मूळ सुचविलेले
प्रश्नपत्रिकेतील गुण गुण बदल
प्रश्न क्र. १ ८ ८
प्रश्न क्र. २ २ ४
प्रश्न क्र. ३ १६ २0
प्रश्न क्र. ४ १४ १८
एकूण ४0 ५0


संकलित चाचणीसाठी सीलबंद प्रश्नपत्रिका येत असल्यामुळे सकाळी प्रश्नपत्रिका संच उघडल्यानंतर ४० गुणांची प्रश्नपत्रिका आहे हे लक्षात आले. त्यामुळे परिपत्रकानुसार सुधारित गुण देण्याचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. - सुभाष चौगले,
जि. प. प्राथमिक शिक्षण अधिकारी.


सातवीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका ४० गुणांची काढून गोंधळात भर पडली आहे. शासनाकडून हा बेफिकीरपणा झाला आहे. जिल्हा माध्य. मुख्याध्यापक संघ या विरोधात आवाज उठवणार आहे. ही चाचणीच बंद करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
- विलास पोवार
अध्यक्ष, जिल्हा माध्य. मुख्याध्यापक संघ.

Web Title:  40 marks paper for 50 times - Confusion in evaluation test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.