नवे ४६ कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:23+5:302021-03-18T04:24:23+5:30
कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४६ रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे २६ रुग्णांचा ...
कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४६ रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे २६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील येलूर येथील ८६ वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
आजरा तालुक्यात एक, करवीर तालुक्यात चार, पन्हाळा दोन, शिरोळ तालुक्यात एक, नगरपालिका क्षेत्रात सहा आणि इतर जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेले सहा असे रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. दिवसभरात २६४ जणांची तपासणी करण्यात आली असून, १,२५१ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ११६ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून, ३३७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
चौकट
सोबत आलेल्याचेही घेतले स्वॅब
सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा अतिरेक होताना दिसत आहे. बुधवारी महापालिकेच्या एका आरोग्य केेंद्रावर चौघी महिला गेल्या होत्या. यातील दोघी जणी आपल्या आई आणि मावशीसोबत त्यांना लस घेऊन येण्यासाठी गेल्या होत्या. तर उर्वरित दोघींनाही सांगून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. आम्हाला काही झालेले नाही, असे सांगत असतानाही त्यांचे स्वॅब घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या एका केंद्रावर स्वॅब देण्यासाठी गेलेल्यांना आमचा ५० चा कोटा पूर्ण झाल्याने येथे स्वॅब घेतला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. मात्र नंतर स्वॅब घेतले गेले.