शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

रंकाळा संवर्धनासाठी ५० लाखांचा निधी,पालकमंत्री पाटील यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 10:57 AM

tourism kolhapur News- ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाखांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पदपथ उद्यानात झालेल्या कार्यक्रमात केली. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या रंकाळा विकास आराखड्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

ठळक मुद्देरंकाळा संवर्धनासाठी ५० लाखांचा निधी,पालकमंत्री पाटील यांची घोषणा राजेंद्र पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाखांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पदपथ उद्यानात झालेल्या कार्यक्रमात केली. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या रंकाळा विकास आराखड्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे आयोजित केलेल्या रंकाळा दिवस समारंभ तसेच पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या रंकाळा -रंकतीर्थ, शौर्यतीर्थ, पक्षितीर्थ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

रंकाळा तलावाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न राजेंद्र पाटील यांनी पुस्तकातून केला असल्याने नव्या पिढीला तलावाचे संदर्भ मिळतील असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, रंकाळा, राजाराम, कोटितीर्थ, कळंबा तलाव कोल्हापूरचे वैभव आहे. कळंबा तलावाचे संवर्धन तसेच सुशोभीकरणाच्या कामाला दि. ३१ मार्चपर्यंत गती मिळेल. ५० लाखांच्या निधीतून रंकाळा तलावाचेही विद्युतीकरण, लॉन, डस्टबिन, बुरुज दुरुस्ती यासारखी कामे हाती घेतली जातील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी रंकाळा या शौर्यतीर्थाचे स्मारक व्हावे आणि त्यामध्ये राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जर शासन कमी पडत असेल तर आम्ही कोल्हापूरकर मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रंकाळा तलाव जसा पर्यटकांना भुरळ घालणार आहे तसाच त्याचा इतिहासदेखील रंजक आहे. तो आज पुस्तकरूपाने समोर आला, असे म्हणाले.प्रारंभी राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत वडगावकर यांनी आणलेला केक कापून रंकाळा तलावाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संध्याकाळी शब्दसुरांच्या झुल्यावर हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम झाला. 

टॅग्स :tourismपर्यटनkolhapurकोल्हापूर