जिल्ह्यातील आठ दिवसांचा कडक लाॅकडाऊन रविवारी मध्यरात्री संपणार आहे. तेथून पुढे राज्य शासनाचे आदेशानुसार मे अखेरपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना दक्षता समितीने गावातील सार्वजनिक आस्थापनांमधून सेवा देणाऱ्या ५० ग्रामस्थांची अँटिजेन रॅपिड टेस्ट घेण्यात आली. यावेळी चाचणी केलेल्या सर्वांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे.
यावेळी शंभरावर अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु आरोग्य विभागाकडून केवळ पन्नासच टेस्टिंग किट आल्यामुळे इतरांना चाचणीशिवाय परत जावे लागले. यामुळे आरोग्य विभागाच्या नियोजनाचा अभाव दिसून आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. उर्वरित चाचण्या सोमवार नंतर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.